Sunday, August 31, 2025 11:46:05 AM

Menstrual Leave: महिला दिनानिमित्त L&T Chairman SN Subrahmanyan यांचे कंपनीतील महिलांना खास गिफ्ट; आता दरमहा मिळणार मासिक पाळीची रजा

एसएन सुब्रमण्यम यांनी त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एक खास घोषणा केली आहे.

menstrual leave महिला दिनानिमित्त lt chairman sn subrahmanyan यांचे कंपनीतील महिलांना खास गिफ्ट आता दरमहा मिळणार मासिक पाळीची रजा
L&T Chairman SN Subrahmanyan
Edited Image

Menstrual Leave: भारतातील आघाडीची कंपनी लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे अध्यक्ष एस.एन. सुब्रह्मण्यम काही दिवसांपूर्वी आठवड्यातून 90 तास काम केल्यामुळे चर्चेत आले होते. एसएन सुब्रमण्यम यांच्या या विधानामुळे त्यांना अनेक लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. परंतु,  आता एसएन सुब्रमण्यम यांनी त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एक खास घोषणा केली आहे. महिला दिनानिमित्त एसएन सुब्रमण्यम यांनी आपल्या कंपनीतील महिलांना खास गिफ्ट दिलं आहे. 

हेही वाचा - Famous Indian Bussinesswomen: जाणून घ्या कोण आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका

L&T कंपनीतील महिलांना मिळणार पिरियड लिव्ह - 

एल अँड टी चे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांनी येत्या महिला दिनानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. सुब्रमण्यम यांनी काल मुंबईतील पवई कार्यालयात 350 महिला कर्मचाऱ्यांमध्ये घोषणा केली की, कंपनीत काम करणाऱ्या महिलांना दरमहा एक दिवस मासिक पाळीची रजा दिली जाईल. एल अँड टी मध्ये एकूण 60,000 कर्मचारी आहेत. यापैकी सुमारे 5 हजार महिला आहेत, म्हणजेच एकूण कर्मचाऱ्यांपैकी 9% महिला आहेत.

हेही वाचा - 'या' राज्यातील महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रोडवेज बसमध्ये करता येणार मोफत प्रवास

कोणत्या महिलांना मिळणार मासिक पाळीच्या वेळी रजा?  

एल अँड टीने स्पष्ट केले की मासिक पाळीच्या रजेची ही सुविधा फक्त उत्पादन आणि अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित महिला कर्मचाऱ्यांसाठी आहे. एल अँड टीच्या इतर सर्व व्यवसायांमध्ये किंवा वर्टिकलमध्ये काम करणाऱ्या महिलांना ही सुविधा मिळणार नाही. कारण घरून काम करण्याची किंवा लवचिक काम करण्याची सुविधा इतर क्षेत्रांमध्ये आधीच उपलब्ध आहे. 
 


सम्बन्धित सामग्री