Sunday, August 31, 2025 05:26:51 PM

Anthrax Symptoms: गायी, म्हशी आणि शेळ्यांपासून पसरतो 'हा' प्राणघातक आजार; आरोग्य मंत्रालयाने सांगितली लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळी आणि मेंढ्या या प्राण्यांमध्ये तो आढळतो. हा रोग प्राण्यांपासून थेट माणसांमध्ये पसरू शकतो. वेळीच ओळख आणि प्रतिबंध न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.

anthrax symptoms गायी म्हशी आणि शेळ्यांपासून पसरतो हा प्राणघातक आजार आरोग्य मंत्रालयाने सांगितली लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय

Anthrax Symptoms: अनेक असे आजार आहेत, जे प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतात. त्यापैकी सर्वात गंभीर म्हणजे अँथ्रॅक्स, ज्याला गिल्टी रोग असेही म्हणतात. हा अत्यंत धोकादायक व संसर्गजन्य आजार आहे. प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळी आणि मेंढ्या या प्राण्यांमध्ये तो आढळतो, परंतु सर्वात मोठी भीती म्हणजे हा रोग प्राण्यांपासून थेट माणसांमध्ये पसरू शकतो. वेळीच ओळख आणि प्रतिबंध न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.

मानवांमध्ये आढळणारी अँथ्रॅक्सची लक्षणे

हा आजार झाल्यास सुरुवातीच्या टप्प्यात त्वचेवर खाज सुटणारे फोड आणि जखमा दिसतात. ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे यासह काही गंभीर प्रकरणांमध्ये रक्ताच्या उलट्या, अतिसार, श्वास घेण्यास त्रास, पोटदुखी आणि तीव्र अस्वस्थता जाणवते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरू शकते.

प्राण्यांमध्ये आढळणारी अँथ्रॅक्सची लक्षणे 

प्राण्यांना हा आजार अचानक होतो आणि ते काही वेळातचं यामुळे मृत्युमुखी पडतात. हा आजार झाल्यास प्राण्यांमध्ये नाक व तोंडातून रक्तस्त्राव, सुस्ती, खाण्याची इच्छा कमी होणे ही महत्त्वाची लक्षणे दिसतात. जनावरांच्या मालकांनी ही लक्षणे वेळीच ओळखली तर रोग पसरण्यापासून अटकाव करता येतो.

हेही वाचा - Causes of Irregular Menstruation: महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोन का वाढतो? मासिक पाळीतील अनियमिततेशी त्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या

प्रतिबंधात्मक उपाय - 

अचानक मृत्यू झालेल्या प्राण्यांना उघड्यावर न सोडता खोल खड्ड्यात पुरणे आवश्यक.
मृत प्राण्याला हात लावताना हातमोजे व मास्क वापरणे बंधनकारक.
संक्रमित प्राण्यांचे मांस व दूध सेवन करणे टाळावे.
प्राण्यांचे वेळोवेळी लसीकरण करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे.
वेळेवर उपचार अत्यावश्यक

हेही वाचा - Vitamin Deficiency: रात्री नीट झोप लागत नाही? असू शकते 'या' विटामिन्सची कमतरता

दरम्यान, जर प्राणी किंवा माणसात अँथ्रॅक्सची लक्षणे दिसली तर त्वरित जवळच्या पशुवैद्य अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्यवेळी उपचार सुरू केल्यास हा आजार नियंत्रणात आणणे शक्य आहे. आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना जागरूक राहण्याचे, प्राण्यांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आणि प्रतिबंधात्मक उपाय काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री