Tuesday, September 02, 2025 12:26:37 AM

Pigeon Carrying Bomb Threat Note: सीमावर्ती भागात कबुतरासह धमकीचे पत्र जप्त; सुरक्षा यंत्रणा सतर्क

या पत्रात जम्मू रेल्वे स्थानकावर आयईडी स्फोट घडवून आणण्याची स्पष्ट धमकी देण्यात आली होती. पाकिस्तानातून आलेले हे कबुतर 18 ऑगस्ट रोजी कटमारिया परिसरातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडण्यात आले.

pigeon carrying bomb threat note सीमावर्ती भागात कबुतरासह धमकीचे पत्र जप्त सुरक्षा यंत्रणा सतर्क

Pigeon Carrying Bomb Threat Note: जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू जिल्ह्यातील आरएस पुरा भागात सुरक्षा दलांनी एक कबुतर पकडले असून त्याच्या पंजाला धमकीचे पत्र बांधलेले आढळले आहे. या पत्रात जम्मू रेल्वे स्थानकावर आयईडी स्फोट घडवून आणण्याची स्पष्ट धमकी देण्यात आली होती. पाकिस्तानातून आलेले हे कबुतर 18 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता कटमारिया परिसरातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडण्यात आले. या घटनेने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून संपूर्ण परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे.

पत्रातील संदेश - 

पकडलेल्या पत्रामध्ये उर्दू आणि इंग्रजी भाषेत संदेश लिहिलेले होते. त्यात 'कश्मीर फ्रीडम' आणि 'टाइम हॅज कम' असे शब्द होते. अधिकाऱ्यांच्या मते, पाकिस्तानकडून यापूर्वीही सीमेवर फुगे, झेंडे आणि कबुतरांच्या माध्यमातून संदेश पाठवले गेले आहेत. परंतु इतक्या गंभीर धमकीचा संदेश कबुतराद्वारे मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा ही घटना अत्यंत गांभीर्याने घेत असून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा - वराह जयंतीला नितेश राणेंनी वराह अवतारात वावरावं, सुषमा अंधारेंचा खोचक टोला

सुरक्षा यंत्रणा सज्ज -

धमकीचे पत्र आढळल्यानंतर जम्मू रेल्वे स्थानक आणि त्याभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथके तैनात केली असून कोणत्याही संभाव्य धोक्याला सामोरे जाण्यासाठी रेल्वे परिसरात निगराणी वाढवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅक, स्थानक परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी कसून तपासणी सुरू आहे.

हेही वाचा - Rapido : रॅपिडोला 50 रुपयांचा दावा करणं पडलं महागात! भरावा लागणार 10 लाखांचा दंड; नेमकं झालं काय ?

दरम्यान, एका सुरक्षा तज्ज्ञाने सांगितले की, अशा घटना हलक्यात घेता येणार नाहीत. कबुतराला विशेष प्रशिक्षण देऊन सीमेपलीकडून पाठवण्यात आले असण्याची शक्यता आहे. याआधी पाकिस्तानकडून सीमा ओलांडून फुगे किंवा झेंड्याद्वारे भारतविरोधी संदेश पाठवले गेले होते, मात्र थेट धमकीचे पत्र पाठवण्याची ही पहिलीच वेळ असल्याने हा विषय अधिक गंभीर मानला जात आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. दहशतवादी आणि भारतविरोधी शक्ती वेगवेगळ्या मार्गांनी कट रचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सुरक्षा दलांच्या दक्षतेमुळे दहशतवाद्यांचा कट उधळून टाकण्यात येत आहे. 


सम्बन्धित सामग्री