Thursday, September 04, 2025 05:19:24 AM

Boy Falls Into Manhole in Surat: सुरतमध्ये 2 वर्षांचा चिमुरडा मॅनहोलमध्ये पडला; बचावकार्य सुरू

मुलाचा शोध घेण्यासाठी सूरत अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (SFES) कर्मचारी तसेच स्थानिक लोक प्रयत्न करत आहेत. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे, चिमुरडा वाहून गेल्या असल्याची भीती देखील वर्तवण्यात येत आहे.

boy falls into manhole in surat सुरतमध्ये 2 वर्षांचा चिमुरडा मॅनहोलमध्ये पडला बचावकार्य सुरू
Boy Falls Into Manhole in Surat
Edited Image

Boy Falls Into Manhole in Surat: गुजरातमधील सुरतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी संध्याकाळी शहरातील वरियव परिसरात 2 वर्षीय मुलगा उघड्या गटाराच्या मॅनहोलमध्ये पडला. मुलाचा शोध घेण्यासाठी सूरत अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (SFES) कर्मचारी तसेच स्थानिक लोक प्रयत्न करत आहेत. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे, चिमुरडा वाहून गेल्या असल्याची भीती देखील वर्तवण्यात येत आहे. 

वृत्तसंस्था एएनआयनुसार, मॅनहोलचे झाकण जड वाहनामुळे खराब झाले होते. राधिका पॉइंटजवळ हा मुलगा त्याच्या आईसोबत जात असताना उघड्या मॅनहोलच्या झाकणात पडला. मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीख यांनी सांगितले की, जड वाहन गेल्याने मॅनहोलचे कव्हर खराब झाले. यात पाय घसरून एक 2 वर्षांचा मुलगा पडला. मुलाचा शोध घेण्यासाठी सुमारे 100-150 मीटरचा परिसर शोधण्यात आला. मुलाला शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. घटनास्थळी बचाव कार्यात येथे 60-70 कर्मचारी तैनात आहेत. अद्याप मुलाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. 

हेही वाचा - दिल्लीत भाजपाचे कमळ फुलणार? ; आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन

घटनास्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या मते, पाण्याच्या प्रवाहात मूल वाहून गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. म्हणूनच सर्व मॅनहोलची तपासणी SFES कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरातील ड्रेनेज सिस्टीममध्ये सांडपाण्याचे पाणी यांचे मिश्रण आहे. ज्यामुळे मुलाच्या जीवाला धोका आहे. मुलाला लवकरात लवकर शोधून वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या मुलाबद्दल काहीही समजू शकलेले नाही.
 


सम्बन्धित सामग्री