दिल्ली : दिल्लीतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. दिल्लीत भाजपाला 48 जागा मिळाल्या आहेत. भाजपाने 48 जागा मिळवत आपचा पराभव केला आहे. तब्बल 27 वर्षानंतर भाजपाने दिल्लीत आपली सत्ता आणली आहे. दिल्लीतील विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावर पोस्ट केली आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आहे. दिल्लीतील भाजपाच्या विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : Delhi Election Results 2025: दिल्लीतील विजयानंतर मुंबईत भाजपाचं जोरदार सेलिब्रेशन
अमित शाहांनी केलेली पोस्ट
वारंवार खोट्या आश्वासनांनी जनतेची दिशाभूल करता येणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे. जनतेने त्यांच्या मतांनी घाणेरडी केलेली यमुना, घाणेरडे पिण्याचे पाणी, तुटलेले रस्ते, तुंबलेले गटार आणि प्रत्येक रस्त्यावर उघडलेली दारूची दुकाने यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. दिल्लीतील या भव्य विजयासाठी ज्यांनी दिवसरात्र काम केले. त्या भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचे, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष विरेंद सचदेवा यांचे मनापासून अभिनंदन करतो. महिलांबद्दलचा आदर असो, अनधिकृत वसाहतीतील रहिवाशांचा स्वाभिमान असो किंवा स्वयंरोजगाराच्या अफाट शक्यता असोत, मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिल्ली आता एक आदर्श राजधानी बनेल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपा विजयी झाल्याने ट्वीटवर एक पोस्ट केली आहे. या ट्वीट पोस्टच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या आम आदमी पार्टीवर निशाणा साधला आहे. सततच्या खोट्या आश्वासनांना जनतेने उत्तर दिले आहे असे गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे. प्रत्येक रस्त्यावर उघडलेली दारूची दुकाने यांच्या विरोधात जनेतेने आवाज उठवला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच विजयाबद्दल त्यांनी सर्व कार्यकार्यकर्ते, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांचे आभार मानले आहेत.
दिल्लीत आज रात्री भाजपचं सेलिब्रेशन होणार आहे. रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार आहेत. रात्री 8 पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. दिल्लीतील विजयाचं भाजपाकडून जोरदार सेलिब्रेशन होत आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे. तसेच भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष केला जात आहे.