Monday, September 01, 2025 12:48:09 AM

2026 पूर्वी नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करू; अमित शहा यांचे आश्वासन

31 मार्च 2025 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर, देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षलवादामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे.

2026 पूर्वी नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करू अमित शहा यांचे आश्वासन
Amit Shah On Bijapur Naxal Encounter
Edited Image

Amit Shah On Bijapur Naxal Encounter: देशातील वाढत्या नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं विधान केलं आहे. 31 मार्च 2025 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर, देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षलवादामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे. दरम्यान, रविवारी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी 31 नक्षलवाद्यांना ठार केलं. या कारवाईदरम्यान पोलिसांनी परिसरातून शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त केली. 

हेही वाचा - Bijapur Naxalite Killed : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक, जवानांकडून १२ नक्षलवाद्यांचा खात्मा

या चकमकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटरवरून पोस्ट करत म्हटले आहे की, 'भारताला नक्षलमुक्त करण्याच्या दिशेने, छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत 31 नक्षलवादी मारले गेले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली. मानवताविरोधी नक्षलवाद संपवण्याच्या प्रयत्नात आज आपण आपले दोन शूर सैनिक गमावले आहेत. हा देश या वीरांचा नेहमीच ऋणी राहील. मी शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. 31 मार्च 2026 पूर्वी आपण देशातून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करू, जेणेकरून देशातील कोणत्याही नागरिकाला त्यामुळे आपला जीव गमवावा लागू नये, असं अमित शहा यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. 

हेही वाचा  -  दिल्लीतील महिलांना मिळू शकते भाजपच्या नव्या सरकाकडून 'हे' खास गिफ्ट; पहिल्या मंत्रिमंडळात घेतला जाणार निर्णय

बिजापूरमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार - 

दरम्यान, बस्तर पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी जंगलात ही चकमक झाली. बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) मधील दोन जवानांनी आपले प्राण गमावले. तसेच गोळीबारात इतर दोन जवान जखमी झाले. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून परिसरात शोध मोहीम सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 


सम्बन्धित सामग्री