नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या काळात भारतीय हवाई दलाची विमाने पडली की नाही? असा सवाल सीडीएस अनिल चौहान यांना ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत करण्यात आला होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताची विमाने पडली का? या प्रश्नाला उत्तर देताना सीडीए अनिल चौहान म्हणाले की, खरा मुद्दा पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात किती विमाने पडली हा नाही तर ती का पडली आणि त्यातून काय शिकलो हा आहे? आम्हाला 'रणनीतीगत चूक' समजून घेण्याची संधी मिळाली. त्यानंतर, आम्ही त्यात सुधारणा केली आणि दोन दिवसांत लांबून लक्ष्य करून पाकिस्तानचे तळ उद्ध्वस्त करून योग्य उत्तर दिले, असं अनिल चौहान यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - 'पाकिस्तान मूलभूत हक्कांशी तडजोड करणार नाही...'; असीम मुनीर यांचा सिंधू करारावरून भारताला इशारा
पाकिस्तानचा दावा फेटाळला -
पाकिस्तानने 6 भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला होता. हा दावा खरा आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना सीडीएस चौहान यांनी हा दावा सरळ फेटाळून लावला आणि म्हटले की हे चुकीचे आहे. येथे गणना महत्त्वाची नाही, परंतु ती का पडली हे महत्त्वाचे आहे? यातून आपण काय शिकलो आणि आपण कोणत्या सुधारणा केल्या?
हेही वाचा - मोठी बातमी! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला; BLA चा दावा
अनिल चौहान यांचा पाकिस्तानवर निशाणा -
सिंगापूरमध्ये झालेल्या शांग्री-ला संवाद कार्यक्रमात संरक्षण प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. सीडीएस म्हणाले की, भारत कोणत्याही रणनीतीशिवाय काहीही करत नाही. आता पाकिस्तानसोबत राजनैतिक संबंध राखण्याचा काळ संपला आहे.