Sunday, August 31, 2025 08:07:17 PM

दिल्लीत सत्ता कोणाची? अखेर कोण राखणार राजधानीचे तख्त? आज समजणार दिल्लीकरांचा कौल

अखेर दिल्लीकरांनी कोणाला कौल दिला हे देखील आज समजणार आहे. दिल्लीत सरकार स्थापनेचा दावा कोणता पक्ष करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.

दिल्लीत सत्ता कोणाची अखेर कोण राखणार राजधानीचे तख्त आज समजणार दिल्लीकरांचा कौल
Delhi Election Result 2025
Edited Image

Delhi Election Result 2025: आज संपूर्ण देशाच्या नजरा देशाची राजधानी दिल्लीवर खिळल्या आहेत. आज दिल्लीत सत्ता नेमकी कोणाची हे समजणार आहे. अखेर दिल्लीकरांनी कोणाला कौल दिला हे देखील आज समजणार आहे. दिल्लीत सरकार स्थापनेचा दावा कोणता पक्ष करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. 

एक्झिटनुसार, यावेळी दिल्ली भाजपला चांगल्या जागा मिळू शकतात. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीत यंदा कोणता नवा इतिहास रचला जाईल, याचा उलगडा आज होणार आहे. कारण गेल्या 27 वर्षांच्या राजकारणावर नजर टाकली तर, 1999, 2014, 2019, 2024 मध्ये भाजपने देशातील चार वेळा लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत, परंतु दिल्लीतील एक्झिट पोलनुसार, भाजपला आता पहिल्यांदाच विजय मिळू शकतो.

हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही; सरकारची राज्यसभेत माहिती

भाजपसाठी दिल्लीचे दरवाजे उघडणार का? 

तथापी, दिल्लीच्या सीमेवरील राज्यांकडे पाहिले तर, गेल्या 27 वर्षांत भाजपने उत्तर प्रदेशात तीनदा सरकार स्थापन केले आहे, त्यापैकी दोनदा मोदींच्या काळात उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाले आहे. 27 वर्षांच्या आत, भाजपने हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे, परंतु आता पहिल्यांदाच भाजपसाठी दिल्लीचे दरवाजे उघडू शकतात. दिल्लीत सलग सहा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर, सातव्या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळू शकतो, असे एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून दिसून येते. 

हेही वाचा - पंतप्रधान मोदी 12-13 फेब्रुवारीला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट

एक्झिट पोलचा कौल -  

1993 मध्ये दिल्लीत पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन झाले होते. आता एक्झिट पोलच्या भाकितानुसार, तब्बला 27 वर्षांनी दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. जर आपण एक्झिट पोल पाहिले तर, जर दिल्लीत भाजप जिंकले तर तो फक्त नरेंद्र मोदींचा विजय म्हणता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणा, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, ओडिशा अशा 6 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री केले. त्यामुळे दिल्लीत आता भाजपचं राज्य असणार का याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. 


सम्बन्धित सामग्री