Women in Delhi will now get Rs 2500 per month
Edited Image
Mahila Samman Yojana: दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निवडणूक आश्वासनांपैकी एक असलेली दिल्ली महिला समृद्धी योजना शनिवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत, दिल्लीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मासिक 2500 रुपये भत्ता मिळेल. 8 मार्च रोजी योजनेच्या लाँचिंगसह अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही योजना विशेषतः महिला सक्षमीकरण आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत, दिल्ली सरकारने महिला मतदारांना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले असून अंदाजे 20 लाख महिलांना याचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - Delhi New CM: सस्पेंस संपला! दिल्लीची कमान रेखा गुप्ता यांच्या हातात; दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ
महिला समृद्धी योजना नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया-
दिल्लीत सुमारे 72 लाख महिला मतदार आहेत, त्यापैकी 20 लाख महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-नोंदणी करणे अनिवार्य असेल. यासाठी 8 मार्च रोजी एक विशेष पोर्टल आणि मोबाईल अॅप लाँच केले जाईल, जिथे महिला मतदार कार्ड, बीपीएल कार्ड, आधार कार्ड आणि उत्पन्न प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे अपलोड करून अर्ज करू शकतील.
हेही वाचा - New Delhi Chief Minister Rekha Gupta : काय आहे रेखा गुप्ता यांची कौटुंबिक पार्श्वभूमी? जाणून घेऊ..
यावर्षी या योजनेसाठी 1 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. तथापि, पुढील वर्षी सरकार योजनेचे बजेट वाढवण्याची शक्यता आहे. या योजनेशी संबंधित सर्व सुविधा महिलांना आधीच देण्यात येत असलेल्या मदतीसह सुरू राहतील आणि त्यात कोणताही व्यत्यय येणार नाही.
महिला समृद्धी योजनेचे उद्दिष्ट -
ही योजना महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. याद्वारे सरकार महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.