Friday, September 19, 2025 12:55:04 PM

Doland Trump Statue : अमेरिकन संसदेबाहेर डोनाल्ड ट्रम्प यांचा 12 फुटी पुतळा; हातात बिटकॉइन

अमेरिकेच्या संसदेबाहेर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तब्बल 12 फूट उंचीचा सोनेरी पुतळा उभारण्यात आला आहे.

doland trump statue  अमेरिकन संसदेबाहेर डोनाल्ड ट्रम्प यांचा 12 फुटी पुतळा हातात बिटकॉइन

नवी दिल्ली : अमेरिकेच्या संसदेबाहेर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तब्बल 12 फूट उंचीचा सोनेरी पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यात ट्रम्प यांच्या हातात बिटकॉइन दाखवण्यात आले असून, हा पुतळा अमेरिकन नागरिकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे हा पुतळा उभारला गेला त्याच दिवशी  फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीची घोषणा केली होती.

बुधवारी दुपारी 2 वाजता फेडरल रिझर्व्हने प्रमुख व्याजदर पाव टक्क्यांनी घटवून 4.3 टक्के वरून 4.1 टक्के  केला. डिसेंबर 2024 नंतरची ही पहिली कपात मानली जात असून, गेल्या वर्षीही रोजगाराची गती कमी होत असल्यामुळे आणि बेरोजगारी वाढत असल्याने तिनदा दरकपात करण्यात आली होती. यावर्षी अजून दोन कपाती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र 2026 मध्ये फक्त एक कपात होईल, अशी माहिती देण्यात आली. वॉल स्ट्रीटने मात्र पुढील वर्षात किमान पाच कपातींची अपेक्षा व्यक्त केली होती.

हेही वाचा : Trump Helicopter Emergency Landing: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग

हा पुतळा सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत तिसऱ्या स्ट्रीटवर नागरिकांसाठी खुला ठेवण्यात आला. ही कलात्मक स्थापना क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांच्या गटाने निधी पुरवून उभारली आहे. आयोजकांच्या मते, या स्थापनेचा उद्देश डिजिटल चलन, आर्थिक धोरण आणि अमेरिकन सरकारची आर्थिक बाजारातील भूमिका याबाबत चर्चा घडवून आणणे आहे.

गटाचे प्रतिनिधी हिचेम झाघदौदी यांनी सांगितले की, “ही ट्रम्प यांच्या पुतळ्याची स्थापना सरकारकडून जारी होणाऱ्या चलनाच्या भविष्यावर विचार करायला प्रवृत्त करेल. तसेच आधुनिक राजकारण आणि आर्थिक नवकल्पनांचा संगम दाखवणारे प्रतीक ठरेल.” ट्रम्प यांनी क्रिप्टोकरन्सीला पाठिंबा दिला होता, त्याच भूमिकेचे हे प्रतिकात्मक दर्शन असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.


सम्बन्धित सामग्री