Monday, September 01, 2025 06:58:25 PM

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये १४९ जण ठार

इस्रायलने मंगळवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात सुमारे १४९ लोकांचा मृत्यू झाला.

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये १४९ जण ठार

इस्रायल : गाझा पट्टीच्या उत्तर भागात विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्रय घेतलेल्या पाच मजली इमारतीवर इस्रायलने मंगळवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात सुमारे १४९ लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महिला आणि मुले यांचे अधिक प्रमाण आहे. ही माहिती गाझाच्या आरोग्य खात्याने दिली. गेल्या महिन्यात इस्रायली हवाई हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्लाह या संघटनेचा नेता हसन नसरल्लाह याच्यानंतर त्या पदावर शेख नइम कासीमची निवड करण्यात आली आहे. इस्रायलविरोधातील संघर्षात विजय मिळेपर्यंत नसरल्लाहच्या धोरणांनुसारच हिजबुल्लाह काम करत राहील, असे त्या संघटनेने सांगितले.

 


सम्बन्धित सामग्री