Thursday, August 21, 2025 02:30:44 AM

‘22 मराठा बटालियन’चा थरारक लूक समोर, शिवाली परब आणि मराठी कलाकारांची दमदार भूमिका!

2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 22 मराठा बटालियन- गोष्ट गनिमी काव्याची या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटात शिवाली परब, प्रवीण तरडे, प्रसाद ओकसह कलाकरांची मांदियळी आहे.

‘22 मराठा बटालियन’चा थरारक लूक समोर शिवाली परब आणि मराठी कलाकारांची दमदार भूमिका
‘22 मराठा बटालियन’चा थरारक लूक समोर, शिवाली परब आणि मराठी कलाकारांची दमदार भूमिका!

मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा 22 मराठा बटालियन- गोष्ट गनिमी काव्याची हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि थरारक अनुभव घेता येणार आहे. या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्याच्या पहिल्या पोस्टरनेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास अनेक वेळा मोठ्या पडद्यावर साकारला गेला आहे. पण '22 मराठा बटालियन' या चित्रपटाद्वारे गनिमी कावा या विशेष रणनितीला केंद्रस्थानी ठेवून तो इतिहास नव्याने उलगडला जाणार आहे. शिवरायांची ही युद्धनीती शत्रूला चकवण्यासाठी वापरली जात होती. या चित्रपटात या रणनितीची विविध तंत्रे आणि तिच्या सहाय्याने मिळवलेले विजय प्रेक्षकांसमोर साकारले जाणार आहेत.

चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये दाट जंगलाच्या पार्श्वभूमीवर '22 मराठा बटालियन' हे हेडिंग झळकत आहे. या चित्रपटाची कथा काय असेल याची उत्सुकता रसिकांमध्ये निर्माण झाली आहे. गनिमी काव्याच्या रणनितीला आधुनिक सादरीकरणात मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात होणार आहे.

चित्रपटात तगडी स्टारकास्टचा भरणा 
२२ मराठा बटालियन- गोष्ट गनिमी काव्याची या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. त्यांनी या आधीही ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर आधारित सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. चित्रपटात प्रवीण तरडे, प्रसाद ओक, अशोक समर्थ, पुष्कर जोग, सोमनाथ अवघडे, अभिनय बेर्डे, उत्कर्ष शिंदे यांसारखे अनुभवी कलाकार झळकणार आहेत. यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता आतापासूनच लागली आहे.   

हेही वाचा - Kiara Advani Pregnant: कियारा- सिद्धार्थच्या आयुष्यात येणार गोड गिफ्ट

शकुंतला क्रिएशन प्रॉडक्शन आणि एस आर फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रुपेश दिनकर आणि संजय बाबुराव पगारे यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. निलेश महिगावकर यांनी चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिले असून, चित्रपटात ऐतिहासिक घटनांना नाट्यमय स्वरूप देण्यात आले आहे.

हेही वाचा - Kiara Advani Pregnant: कियारा- सिद्धार्थच्या आयुष्यात येणार गोड गिफ्ट

महाराजांच्या युद्धनीतीचे आधुनिक सादरीकरण, रोमांचक अनुभव 
22 मराठा बटालियन- गोष्ट गनिमी काव्याची हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अधिक व्यापक प्रेक्षक वर्गाला हा ऐतिहासिक चित्रपट अनुभवता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची आधुनिक सादरीकरणातून मांडणी करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देईल, अशी आशा आहे. 


सम्बन्धित सामग्री