Thursday, August 21, 2025 02:29:39 AM

सोलापूर जिल्हा बँकेच्या नुकसानीत 32 दिग्गज अडचणीत

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनियमित कर्ज वाटपामुळे बँकेला तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

सोलापूर जिल्हा बँकेच्या नुकसानीत 32 दिग्गज अडचणीत

 

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनियमित कर्ज वाटपामुळे बँकेला तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या आणि याप्रकरणात दोषी असलेल्या 32 जणांकडून वसुलीचे आदेश चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत. हा निकाल 8 नोव्हेंबरला दिला होता. सहा वर्षांनंतर बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून यात विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार बबन शिंदे, संजय शिंदे, चंद्रकांत देशमुख, सिद्रामप्पा पाटील यांच्यासह 32 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे

 

नेमकं प्रकरण काय ?

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अनियमित कर्जाच्या वाटपामुळे अडचणीत आली. यामध्ये सोलापूर बँकेचे 238 कोटी 43 लाख रूपयांचं आर्थिक नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. बँकेने अनियमित कर्जाचे वाटप केले. त्या कर्जाची रिकव्हरी झाली नसल्याच्या कारणामुळे बँकेला त्याचा मोठा फटका बसला. या रकमेची वसुली करण्याचे आदेश डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिले. सोलापूर बँकेच्या अनियमित कर्ज वाटपाच्या प्रकरणात दिग्गज मंडळींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार बबन शिंदे, संजय शिंदे, चंद्रकांत देशमुख, सिद्रामप्पा पाटील यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री