Earthquake In Afghanistan: भारताचा शेजारील देश अफगाणिस्तान रविवारी-सोमवारच्या रात्री उशिरा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. अफगाणिस्तानमध्ये रात्रीपासून सकाळपर्यंत 6.3 ते 5 रिश्टर स्केल तीव्रतेचे सलग भूकंप झाले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचे केंद्र बसौलपासून 36 किमी अंतरावर होते. या भीषण हादऱ्यांमुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, रात्री 12:47 वाजता पहिला 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर 1:08 वाजता 4.7, 1:59 वाजता 4.3, 3:03 वाजता 5.5 आणि 5:16 वाजता 5 तीव्रतेचे भूकंप नोंदवले गेले. या धक्क्यांची जाणीव दिल्ली-एनसीआरपर्यंत झाली.
हेही वाचा - March For Australia: ऑस्ट्रेलियात भारतीयांविरुद्ध संतापाचा उद्रेक! हजारो लोक रस्त्यावर उतरले; अनेक शहरांत निदर्शने
स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भूकंपाचे धक्के बसौल आणि आसपासच्या भागात सर्वाधिक जाणवले. रात्रीच्या वेळी झालेल्या या हादऱ्यांमुळे लोक घराबाहेर धावले. अनेक भागांत झोपड्या, घरांची भिंत आणि काही जुन्या इमारतींना मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - PM Modi China Visit: भारत-चीन मैत्री गरजेची; मोदींच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांचे वक्तव्य
दरम्यान, ऑक्टोबर 2023 मध्ये अफगाणिस्तानात 6.3 रिश्टर स्केलचा प्रचंड भूकंप झाला होता, ज्यात तालिबान सरकारनुसार किमान 4,000 लोकांचा मृत्यू झाला होता. अलिकडच्या काळातील ही सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती मानली जाते.