Wednesday, September 03, 2025 11:27:09 PM

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरीला

अज्ञात महिलेने बाळ चोरल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरीला

नाशिक : नाशिक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात महिलेने बाळ चोरल्याने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. अवघ्या पाच दिवसाच्या बाळाची चोरी एका महिलेने केली आहे. 
रुग्णालयातून पाच दिवसाचे बाळ चोरी केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात तपासासाठी आले आहेत. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 


हेही वाचा : आमदार धसांचा अजित पवारांवर निशाणा
 

नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. पाच दिवसांचे बाळ चोरी करणाऱ्या महिलेचे नाव सुमन अब्दुल खान आहे. ही सटाणा येथे राहणारी आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

नाशिकमध्ये बाळ चोरीची घटना घडल्याने रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन तिथे घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पोलिसांनाकडून बाळ चोरी केलेल्या महिलेचा शोध सुरू आहे. 
 


सम्बन्धित सामग्री