Monday, September 01, 2025 03:13:59 AM

TRAI च्या आदेशामुळे Airtel, Jio, Vi ने घेतला मोठा निर्णय! 120 कोटी वापरकर्त्यांना मिळणार दिलासा

अलीकडेच, टेलिकॉम नियामकाने टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या वेबसाइट आणि अॅप्सवर नेटवर्क कव्हरेज मॅप्स प्रकाशित करण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून वापरकर्त्यांना ऑपरेटर निवडण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

trai च्या आदेशामुळे airtel jio vi ने घेतला मोठा निर्णय 120 कोटी वापरकर्त्यांना मिळणार दिलासा
TRAI
Edited Image

Mobile Coverage Maps: दूरसंचार कंपन्या एअरटेल, जिओ आणि व्हीआय यांनी वेबसाइट आणि अॅप्सवर त्यांचे 5G, 4G आणि 2G कव्हरेज नकाशे प्रकाशित केले आहेत. अलीकडेच, टेलिकॉम नियामकाने टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या वेबसाइट आणि अॅप्सवर नेटवर्क कव्हरेज मॅप्स प्रकाशित करण्याचे निर्देश दिले होते, जेणेकरून वापरकर्त्यांना ऑपरेटर निवडण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

ऑपरेटर निवडण्यास होणार मदत - 

एमएनपी नियमांनुसार, नवीन सिम खरेदी केल्यानंतर 90 दिवसांनीच मोबाईल वापरकर्ते त्यांचा नंबर दुसऱ्या ऑपरेटरला पोर्ट करू शकतात. यापूर्वी सिम खरेदी करताना, वापरकर्त्यांना त्यांच्या क्षेत्रात कोणत्या टेलिकॉम ऑपरेटरचे नेटवर्क चांगले आहे आणि कोणते नाही, यासंदर्भात माहिती नव्हकी, वापरकर्त्यांना भेडसावणाऱ्या या समस्येला लक्षात घेऊन, दूरसंचार नियामकाने अलीकडेच दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या वेबसाइट किंवा अॅपवर त्यांच्या नेटवर्क कव्हरेजचा तपशीलवार नकाशा प्रकाशित करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा - RBI Repo Rate Cut: रेपो रेटमध्ये मोठी कपात! तुम्हाला फायदा होणार की तोटा ? जाणून घ्या

नेटवर्क कव्हरेज नकाशे - 

ट्रायने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लँडलाइन, मोबाइल आणि ब्रॉडबँड सेवा गुणवत्ता मानकांमध्ये सुधारणा केली होती. टेलिकॉम रेग्युलेटरने टेलिकॉम ऑपरेटर्सना त्यांच्या वेबसाइटवर भू-स्थानिक नेटवर्क कव्हरेज नकाशे प्रकाशित करण्याचे आदेश दिले होते. या नकाशामध्ये वापरकर्ते वायरलेस व्हॉइस किंवा ब्रॉडबँड सेवा कुठे उपलब्ध आहे हे जाणून घेऊ शकतील. दूरसंचार विभागाने (DoT) त्यांच्या अधिकृत X हँडलद्वारे दूरसंचार ऑपरेटर्सनी प्रकाशित केलेल्या कव्हरेज मॅपची प्रतिमा पोस्ट केली आहे जेणेकरून वापरकर्ते आता ऑपरेटर निवडण्यापूर्वी कव्हरेज मॅप तपासू शकतील. 

हेही वाचा - Bank Of Baroda ने सुरू केली नवीन FD योजना; 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 'इतका' परतावा

120 कोटी वापरकर्त्यांना दिलासा - 

दरम्यान, ट्रायच्या या आदेशानंतर देशातील 120 कोटी मोबाईल वापरकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विद्यमान वापरकर्ते नवीन टेलिकॉम ऑपरेटर निवडण्यासाठी कव्हरेज मॅप वापरू शकतील. ट्रायने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दूरसंचार सेवा प्रदात्यांनी कव्हरेज नकाशे प्रकाशित केल्याने ग्राहक आणि टीएसपी यांच्यात पारदर्शकता राहील. ट्रायच्या आदेशानुसार दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइट आणि अॅप्सवर कव्हरेज नकाशे प्रकाशित केले आहेत. तथापि, सरकारी दूरसंचार कंपन्या बीएसएनएल आणि एमटीएनएल यांनी त्यांचे नेटवर्क कव्हरेज मॅप प्रकाशित केलेले नाही. या टेलिकॉम ऑपरेटर्सना लवकरच त्यांचा कव्हरेज मॅप देखील प्रकाशित करावा लागेल.


सम्बन्धित सामग्री