Sunday, August 31, 2025 08:40:53 AM

Akshaya Tritiya 2025 Wishes: अक्षय्य तृतीयानिमित्त प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा

हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. यंदा अक्षय्य तृतीया हा सण बुधवार, 30 एप्रिल 2025 रोजी आहे.

akshaya tritiya 2025 wishes अक्षय्य तृतीयानिमित्त प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा

Akshaya Tritiya 2025 Wishes: साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच,अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. यंदा अक्षय्य तृतीया हा सण बुधवार, 30 एप्रिल 2025 रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार,अक्षय्य तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. या दिवशी अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी नारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

अक्षय्य तृतीयेला द्या ‘या’ खास शुभेच्छा!
 
अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
अक्षय राहो आरोग्य तुमचे…
असो तुमची किर्ती अपरंपार..
हो तुमची सदा जयजयकार…
हो तुमची सदा जयजयकार…
अक्षय्य तृतीया दिनाच्या आपणास मंगलमय शुभेच्छा..!

 दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा…

अक्षय तृतीया आली आहे..
सोबतच आनंद घेऊन आली आहे..
सुख समृद्धी मिळवा..
प्रेमाचा बहार आला आहे..
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला..
अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश

प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..

शुभ दिवशी शुभ संदेश मिळो,
शुभ दिवसाचा आरंभ होवो खास…
या दिवशी तुमच्या घरी होवो विष्णू आणि लक्ष्मीचा वास

तुमच्या व्यवसायात वाढ होऊ देत,
तुमच्या कुटुंबात सदैव प्रेम आणि आपुलिक राहो,
संपत्तीचा वर्षाव होवो,
अक्षय्य तृतीयेचा शुभेच्छा !

 अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा!
या पावन दिनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो!
अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी, तुम्हाला भरभरून यश आणि आनंद मिळो!
आपण अक्षय्य तृतीया साजरी करत असताना, तुम्हाला समृद्धी आणि विपुलतेने भरलेले वर्ष जावो! 

देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल,
अक्षय्य तृतीयेला संपत्तीचे भांडार असेल.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !


अशाप्रकारे तुम्ही आपल्या कुटुंबियांना मित्र परिवाराला अक्षय्य तृतीयेच्या खास / संदेश देऊ शकता 


सम्बन्धित सामग्री