Putin's Bodyguards Carry Poop Suitcase : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्याकडे जगातील सर्वात मजबूत सुरक्षा पथक आहे. परंतु, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग असा आहे, ज्याबद्दल जाणून लोकांना आश्चर्य वाटते. प्रत्यक्षात, पुतिन जिथे जातात तिथे त्यांचे अंगरक्षक त्यांच्यासोबत एक खास 'पूप सुटकेस' घेऊन जातात. या सुटकेसचा वापर पुतिन यांची विष्ठा आणि मूत्र गोळा करण्यासाठी केला जातो. पुतिन जेवढे दिवस एखाद्या ठिकाणी दौऱ्यावर असतील, तेथे सर्व ठिकाणी हे मलमूत्र गोळा करून या सूटकेसमधून ते सुरक्षितपणे रशियाला परत नेले जाते. या सुटकेसचा यासाठीच वापर केला जातो. तर, चला जाणून घेऊया, असे का बरे केले जाते?
अंगरक्षक विशेष पिशव्यांमध्ये कचरा गोळा करतात
पुतिन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी अलास्काला पोहोचले, तेव्हा ही माहिती अधिक चर्चेत आली. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ही अनोखी व्यवस्था अशा प्रकारे केली जाते की, कोणत्याही परदेशी शक्तीला पुतिन यांच्या आरोग्याशी संबंधित गोपनीय माहिती मिळू नये. पत्रकार रेगी जेंटे आणि मिखाईल रुबिन यांनी दावा केला आहे की, रशियाची फेडरल प्रोटेक्शन सर्व्हिस हे काम हाताळते. त्यांच्या मते, पुतिन यांचे अंगरक्षक त्यांचे मलमूत्र, कचरा विशेष पिशव्यांमध्ये गोळा करतात आणि ते ब्रीफकेसमध्ये बंद करून तो रशियाला परत घेऊन जातात. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, पुतिन यांनी व्हिएन्ना भेटीदरम्यान पोर्टेबल टॉयलेटचा वापर केला होता आणि त्या काळातही त्यांचे मलमूत्र रशियाला परत पाठवण्यात आले होते. असे म्हटले जाते की, ही व्यवस्था नवीन नाही, तर 1999 पासून, जेव्हा पुतिन पहिल्यांदा सत्तेवर आले तेव्हापासून आहे.
हेही वाचा - Trump-Putin To Meet In Alaska : 58 वर्षांपूर्वीची रशियाची चूक, अलास्का अमेरिकेला विकला; इथेच ट्रम्प-पुतिन भेटतील
हे का केले जाते?
असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीच्या मलमूत्रावरून त्याच्या आरोग्याशी संबंधित बरीचशी महत्त्वाची माहिती उघड होऊ शकते. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मलमूत्राचे नमुने एखाद्या व्यक्तीला कोणता आजार आहे, शरीरात हार्मोन्सची पातळी काय आहे किंवा कर्करोग किंवा हृदयाशी संबंधित समस्या यांसारखा गंभीर आजार आहे की, नाही हे उघड करू शकतात. यामुळेच पुतिन यांचे सुरक्षा पथक त्यांच्या मलमूत्राचा कोणताही नमुना परदेशी संस्थांपर्यंत पोहोचू नये, याची खात्री करते.
पुतिन यांच्या आरोग्याबद्दल चर्चा.. ते आजारी आहेत का?
पुतिन यांच्या आरोग्याबद्दल बऱ्याच काळापासून अटकळ बांधली जात आहे. गेल्या वर्षी कझाकस्तानमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांचे सतत पाय थरथरताना दिसले. त्यानंतर, लोकांना असे वाटले की त्यांना पार्किन्सनसारखा आजार असू शकतो. 2023 मध्ये जेव्हा पुतिन बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांची भेट घेतली तेव्हाही त्यांचे शरीर थरथरत असलेले जाणवले. या घटनांमुळे त्यांच्या आरोग्याबद्दलचे प्रश्न आणखी वाढले.
असे दावे यापूर्वीही केले गेले आहेत
काही वृत्तांत असा दावाही करतात की, पुतिन यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यावेळी त्यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आपत्कालीन उपचार घ्यावे लागले होते. जरी या दाव्यांची अधिकृतपणे कधीही पुष्टी झाली नसली तरी, यावरून हे स्पष्ट होते की त्यांच्या आरोग्याबद्दल नेहमीच चर्चा होते. एकंदरीत, पुतिन यांचा 'पूप सूटकेस प्रोटोकॉल' हा केवळ एक सुरक्षा उपाय नाही तर त्यांच्या वैद्यकीय गोपनीयतेचे रक्षण करण्याचा एक मार्ग देखील आहे. जगातील इतर देशांना भेट दिल्यानंतरही, ते त्यांच्या वैयक्तिक आरोग्याबद्दल इतरांना माहिती देऊ शकेल, असा कोणताही संकेत मागे सोडत नाहीत.
हेही वाचा - Pregnant Woman Suffers : 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेची बांगलादेशी म्हणून रवानगी; नंतर भारतीय घुसखोर म्हणून बांगलादेशात अटक