Monday, September 01, 2025 11:16:26 AM

अंबादास दानवे नाचले, उधळल्या नोटा

शिउबाठाचे नेते अंबादास दानवे यांच्या कार्यकर्त्यांना गणपती विसर्जन मिरवणुकीत पैशांची उधळण केली.

अंबादास दानवे नाचले उधळल्या नोटा

छत्रपती संभाजीनगर : चारच दिवसांपूर्वी ठाण्यातील आनंद दिघे आश्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने पैशांची उधळण केली होती. त्यानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनीही नाराजी व्यक्त केली होती तर शिउबाठाच्या नेत्यांनी निषेध केला होता. आता शिउबाठाचे नेते अंबादास दानवे यांच्या कार्यकर्त्यांना गणपती विसर्जन मिरवणुकीत पैशांची उधळण केली. शिउबाठाच्या कार्यकर्त्याने केलेल्या या कृत्याबाबत शिउबाठा काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 


सम्बन्धित सामग्री