Sunday, August 31, 2025 11:18:30 AM

वंदे भारतच्या तुलनेत अमृत भारत एक्सप्रेसचा कराल स्वस्त प्रवास लवकरचं

विना एसी अमृत भारत एक्सप्रेसच्या चाचणीला सुरुवात, महाराष्ट्राला नवीन रेल्वेचा मार्ग मोकळा

वंदे भारतच्या तुलनेत अमृत भारत एक्सप्रेसचा कराल स्वस्त प्रवास लवकरचं 

 माझगाव कारशेडमध्ये अमृत भारत एक्सप्रेस दाखल, महाराष्ट्राला नवीन ट्रेनचा लाभ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेली अमृत भारत एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली असून, आज राज्यात तिची चाचणी घेण्यात येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या तुलनेत अधिक परवडणारी आणि विना एसी असलेली ही ट्रेन प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.

माझगाव कारशेडमध्ये दाखल, विविध रेल्वे विभागांमध्ये (डिव्हिजन) चाचणी सुरू
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अमृत भारत एक्सप्रेसची चाचणी महाराष्ट्रातील विविध रेल्वे डिव्हिजनमध्ये होणार आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर याची प्राथमिक चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता माझगाव कारशेडमधून ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात दाखल झाली आहे.

इगतपुरी ते CSMT या मार्गावर आज चाचणी केली जाणार आहे. यानंतर या रेल्वेचा तपशीलवार अहवाल तयार केला जाईल आणि तो रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल.

वंदे भारतच्या तुलनेत स्वस्त पर्याय
वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दरांवर टीका झाल्यानंतर केंद्र सरकारने विना एसी अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. या रेल्वेच्या तिकिटांचे दर सामान्य प्रवाशांना परवडणारे असणार आहेत.

अशी होणार रेल्वेची चाचणी
या चाचणी दरम्यान ब्रेकिंग सिस्टीम, एअर सस्पेंशन, कप्लर फोर्स आणि वेग क्षमता यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची तपासणी केली जाणार आहे. अमृत भारत एक्सप्रेस प्रति तास 130 किमी वेगाने धावण्यास सक्षम असून, ती वळणदार मार्गांवरही स्थिरतेने धावू शकते.

अमृत भारत एक्सप्रेसच्या वैशिष्ट्ये
16 डबे असलेली ही ट्रेन
11 AC-3 टियर, 4 AC-2 टियर आणि 1 फर्स्ट AC कोचचा समावेश
प्रत्येक डब्यात चार्जिंग पोर्ट, फोल्डेबल स्नॅक टेबल, LED प्रकाशयोजना
लॅपटॉप चार्जिंगची सुविधा
अग्निसुरक्षा प्रणालीसह पूर्ण डबे संरक्षित
दृष्टिहीन प्रवाशांसाठी ब्रेल नेव्हिगेशनची सोय
पेन्ट्री कार, गार्ड कोच आणि सामानासाठी विशेष डबे
शुक्रवारी झालेल्या चाचणीनंतर ही ट्रेन इतर डिव्हिजनमध्येही पाठवली जाणार आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांना या नवीन पर्यायामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

👉👉 हे देखील वाचा : नऊशे कोटींच्या सिडको प्रकल्पावरून भाजप-शिवसेनेत नव्या संघर्षाला तोंड?


सम्बन्धित सामग्री