मुंबई : राज्यात आज बैलपोळा सण साजरा होत आहे. शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणून बैलाची पूजा या निमित्ताने केली जाते. बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जातो. राज्यातील विविध भागांमध्ये बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. मिरवणुकीदरम्यान अनेकदा डिजेचा वापर केला जातो. मात्र याचा बैलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे मिरवणुकीत डिजे न लावण्याचे निर्देश अॅनिमल राहत या संस्थेच्या वतीने देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांनी बैलाची शिंगे तासल्याने व रासायनिक रंग लावल्यामुळे बैलांच्या डोळ्यांना इजा होते. यामुळे अनेकदा कॅन्सर होण्याचा धोका असल्याने बैलांच्या शिंगांना रासायनिक रंग लावणे तसेच शिंगे तासणे टाळा, असे या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. बैलपोळा साजरा करतानाची नियमावलीच अॅनिमल राहतच्या वतीने जारी करण्यात आली आहे.
हेही वाचा : Today's Horoscope : तुम्ही 'या' राशीचे आहात का? संशयास्पद योजनांमध्ये गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा...
पूर्वी नैसर्गिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या सणाचे स्वरुप कालांतराने बदललं गेले. आता बैलांना सजविण्यासाठी त्यांची शिंगे तासने, शिंगाला आणि शरीरावर रासायनिक रंग लावणे त्यांना डिजेसमोर मिरवणुकीत तासन्तास उभे करणे, असे प्रकार सर्रास होतात. या सर्व चुकीच्या पद्धतींमुळे बैलांना वेगवेगळे आजार होतात. यासाठी अशा गोष्टी टाळण्यासाठी संस्थेकडून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
हे नियम बंधनकारक
१. शिंगे तासू नका. इंगूळऐवजी रंगीत रिबिन वापरा.
२. बैलांना रासायनिक रंग न लावता नैसर्गिक फुलांनी सजवा
३. डिजेच्या मोठ्या आवाजासमोर उभे करणे टाळा.
४. बैलांना जबरदस्तीने नाचवू नका.
५. मिरवणुकीत मोठ्या आवाजाचे फटाके वापरू नका.
६. महत्वाचे म्हणजे त्यांना भरपूर आराम द्या.
७. पुरेसा आहार व पाणी उपलब्ध करून द्या.
८. वेसणीऐवजी म्होरकीचा वापर करा.
९. दोन दाव्याऐवजी एक दावे वापरा.
१०. बैल व इतर जनावरांना दररोज खररा करा.