Monday, September 01, 2025 04:02:54 PM

ITR Filing Documents: पहिल्यांदाच आयकर भरत आहात? ही 7 कागदपत्रं आधीच तयार ठेवा

यावर्षी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबरपर्यंतचं आहे. अशा वेळी, आयटीआर भरण्यापूर्वी कोणते महत्त्वाचे कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे.

itr filing documents पहिल्यांदाच आयकर भरत आहात ही 7 कागदपत्रं आधीच तयार ठेवा
ITR Filing Documents
Edited Image

ITR Filing Documents: जर तुम्ही अद्याप आयकर रिटर्न (ITR) भरला नसेल, तर आता वेळ वाया घालवू नका. कारण, यावर्षी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबरपर्यंतचं आहे. अशा वेळी, आयटीआर भरण्यापूर्वी कोणते महत्त्वाचे कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे. चला तर मग, आयकर भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासते? ते जाणून घेऊयात. 

फॉर्म 16 - 

जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमचा नियोक्ता तुम्हाला फॉर्म 16 देतो. यामध्ये तुमचा एकूण पगार, टीडीएस (Tax Deducted at Source), आणि कर रक्कम दाखवलेली असते. हा फॉर्म आयटीआर भरण्यासाठी सर्वात महत्वाचा दस्तऐवज आहे.

फॉर्म 26AS आणि एआयएस (AIS)

फॉर्म 26 एएस तुमच्यावर किती कर जमा झाला आहे हे दाखवते. तर एआयएस म्हणजेच वार्षिक माहिती विवरणपत्रात तुमच्या बँकेचे, शेअर्सचे, व्याजाचे तपशील असतात. या दोन्ही गोष्टी पाहून तुम्ही तुमचे उत्पन्न आणि कर याची पुष्टी करू शकता. हे फॉर्म पाहून तुम्ही तुमचे उत्पन्न योग्य प्रकारे मांडू शकता.

बँक स्टेटमेंट आणि व्याज प्रमाणपत्र

तुम्हाला एफडी (FD), बचत खाते, किंवा इतर कोणत्याही स्रोतामधून व्याज मिळत असेल, तर बँकेचे स्टेटमेंट व इंटरेस्ट सर्टिफिकेट घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा - ITR भरण्याची शेवटची तारीख कधी आहे? जाणून घ्या

पगार स्लिप

पगार स्लिपमध्ये तुमच्या पगारात बेसिक, एचआरए, बोनस, कपात इत्यादी गोष्टी सांगितलेल्या असतात. या गोष्टी तुम्हाला योग्य तपशील भरण्यास मदत करतात. 

गुंतवणुकीचा पुरावा - 

जर तुम्ही LIC, PPF, ELSS, किंवा इतर टॅक्स-सेव्हिंग योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर यासंदर्भातील प्रमाणपत्रे साठवून ठेवा. या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सवलत मिळू शकते.

भाडे पावत्या आणि करारपत्र

एचआरए क्लेम करण्यासाठी तुम्ही राहत असलेल्या घराचा भाडे करार आणि दरमहा दिलेल्या भाड्याच्या पावत्या सादर करणे आवश्यक आहे.

गृह कर्जावरील व्याज प्रमाणपत्र

तथापी, जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल, तर बँकेकडून मिळणारे इंटरेस्ट सर्टिफिकेट सादर करून, त्यावर देखील कर सवलत घेता येते.

हेही वाचा - ग्रे मार्केट म्हणजे काय? IPO पूर्वी तुम्ही कंपनीचे शेअर्स कसे खरेदी करू शकता? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

आयटीआर भरण्याआधी वरील सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा. जेणेकरून तुमचे रिटर्न अचूक आणि वेळेत भरता येतील. शेवटच्या क्षणी घाई न करता नियोजनबद्धपणे आयकर भरल्यास तुम्हाला कर सवलतही मिळू शकते.
 


सम्बन्धित सामग्री