Monday, September 01, 2025 05:22:22 PM

Women's World Cup 2025: महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी बक्षीस रकमेची घोषणा; 2022 च्या तुलनेत बक्षीस रकमेत चार पट वाढ

विजेत्या संघाला 4.48 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 39.4 कोटी रुपये) बक्षीस मिळणार असून, ही रक्कम 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकापेक्षा चारपट जास्त आहे.

womens world cup 2025 महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी बक्षीस रकमेची घोषणा 2022 च्या तुलनेत बक्षीस रकमेत चार पट वाढ

Women's World Cup 2025: 30 सप्टेंबरपासून भारतात सुरू होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी आयसीसीने बक्षीस रक्कमेची घोषणा केली आहे. विजेत्या संघाला 4.48 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 39.4 कोटी रुपये) बक्षीस मिळणार असून, ही रक्कम 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकापेक्षा चारपट जास्त आहे. 2022 चा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

स्पर्धेतील एकूण आठ संघांसाठी एकूण बक्षीस रक्कम 13.88 दशलक्ष डॉलर्स असून, ही 2022 मधील न्यूझीलंड महिला विश्वचषकाच्या 3.5 दशलक्ष डॉलर्सच्या रकमेपेक्षा 297 टक्के  जास्त आहे. 2023 च्या पुरुष एकदिवसीय विश्वचषकाची बक्षीस रक्कम 10 दशलक्ष डॉलर्स होती, त्यामुळे महिला विश्वचषकाची बक्षीस रक्कम पुरुष विश्वचषकापेक्षा जास्त ठरली आहे.

हेही वाचा - Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे नेतृत्व नीरज चोप्राकडे

उपविजेता संघाला 2.24 दशलक्ष डॉलर्स, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना 1.12 दशलक्ष डॉलर्स, गट-टप्प्यात जिंकलेल्या प्रत्येक सामन्यासाठी 34,314 डॉलर्स मिळतील. पाचव्या आणि सहाव्या स्थानावरच्या संघांना 700,000 डॉलर तर सातव्या व आठव्या स्थानावरील संघांना 280,000 डॉलर मिळतील. स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाला 250,000 डॉलर मिळणार आहेत.

हेही वाचा - R Ashwin In T20 League: आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर अश्विन आता 'या' परदेशी लीगमध्ये खेळणार

दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितले की, बक्षीस रकमेतील चार पट वाढ महिला क्रिकेटच्या विकासासाठी ऐतिहासिक आहे. भविष्यात महिला क्रिकेटपटूंना व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुरुषांइतकीच संधी व मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री