Sunday, August 31, 2025 08:58:46 PM

बिग अलर्ट! 500 वर्षांनंतर गुरु ग्रह होतोय अतिचारी! या 4 राशींना सावध राहावे लागणार; 2032 पर्यंत अस्थिरता

गुरु ग्रह 14 मे रोजी मिथुन राशीत संक्रमण करेल आणि 5 महिन्यांनंतर, अतिक्रमणशील वेगाने पुढे जात, 18 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करेल.

बिग अलर्ट 500 वर्षांनंतर गुरु ग्रह होतोय अतिचारी या 4 राशींना सावध राहावे लागणार 2032 पर्यंत अस्थिरता

Guru Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, एक मोठी घटना लवकरच घडणार आहे. गुरू ग्रह अतिचारी होणार आहे. 14 मे रोजी गुरू ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत जाणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिचारी चाल म्हणजे खूप वेगाने भ्रमण करणे. गुरू ग्रह पुढील 8 वर्षे म्हणजेच 2032 सालापर्यंत अतिचारी चाल करणार आहे.

साधारणपणे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी गुरूला 12 ते 13 महिने लागतात. परंतु यावेळी गुरू वर्षातून तीन वेळा आपली चाल बदलणार आहे. गुरु ग्रह 14 मे रोजी मिथुन राशीत संक्रमण करेल आणि 5 महिन्यांनंतर, अतिक्रमणशील वेगाने पुढे जात, 18 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश करेल. त्यामुळे काही राशींना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. या काळात सर्वांनीच आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्याच्या बाबतीत किंवा कौटुंबिक गरज नसताना झटपट निर्णय घेऊ नयेत. काळजीपूर्वक, विचारपूर्वक आणि अनुभवी-माहीतगार लोकांशी चर्चा-विचारपूस करून निर्णय घ्यावेत. विनाकारण घाबरून जाऊ नये किंवा अतिआत्मविश्वासात राहू नये.

हेही वाचा - Shri Kedarnath Dham 2025 : केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; भक्तिमय वातावरणात तीर्थयात्रेला सुरुवात

तर, या काळात 'या' राशींना अत्यंत सावधगिरीने कामे करण्याची आवश्यकता आहे. दर गुरुवारी गुरु ग्रहाची पूजा करण्याचा सल्ला दिला जात आहे. गुरु ग्रहाच्या अतिचारी चालीमुळे कोणत्या राशींना अडचणी येऊ शकतात त्याविषयी जाणून घेऊया.

वृषभ - गुरू ग्रहाच्या अतिचारी चालीमुळे वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक समस्या येऊ शकतात. याशिवाय, गुरू ग्रह तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करू शकतो. या काळात पैसे आणि मालमत्तेची विशेष काळजी घ्या. महत्त्वाची सर्व कागदपत्रे नीट तपासा. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर, या काळात ही योजना पुढे ढकला.

मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिचारी गुरु मध्यम परिणाम देणारा असणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात, ज्यामुळे ते महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत, कामात अडचणी येऊ शकतात. या राशीच्या लोकांना नोकरी बदलण्याची संधी मिळेल, परंतु या संधी फार चांगल्या नसतील. शिवाय कामाच्या ठिकाणी वरिष्ठांमुळे त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

कर्क - कर्क राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात अतिचारी गुरु समस्या निर्माण करू शकतो. या काळात जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, नात्यात कटुता येऊ शकते. बोलणं चांगलं ठेवा, एकमेकांना समजून घ्या. टोकाचे निर्णय टाळा. व्यावसायिकांच्या योजना सपशेल अयशस्वी होतील, ज्यामुळे त्यांचे खर्च भागणार नाहीत. यासाठी व्यापार-उद्योगात अत्यंत सावध रहावे,

धनु - गुरू ग्रह अतिचारी असल्याने धनु राशीच्या लोकांना पैशाचा वापर काळजीपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातोय. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. या काळात व्यावसायिकांनी आपल्या वरिष्ठांशी बोलताना चुकीचे शब्द वापरू नये. तुमच्या उत्पन्नातही घट दिसून येऊ शकते. तुम्ही पैसे कमवले तरी ते गमावण्याचा किंवा खर्चाचा धोका सतत असेल. वायफळ खर्च टाळावा. आवश्यक तेथेच खर्च करावा.

हेही वाचा - नखांचा रंग बदलल्याने आयुष्य बदलू शकते का? जाणून घ्या, काय आहे 'ग्रीन नेल थिअरी'..

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
 


सम्बन्धित सामग्री