Wednesday, August 20, 2025 01:25:57 PM

सावधान! आता आली टक्कल पडण्याची साथ

सद्या सर्वत्र चर्चा आहे ती HMPV व्हायरसची त्यातच आता एकच खळबळ उडालीय ती म्हणजे केस गळतीच्या साथीने. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण शेगावात या अज्ञात आजाराने थैमान घातलय.

सावधान आता आली टक्कल पडण्याची साथ

शेगाव: सद्या सर्वत्र चर्चा आहे ती HMPV व्हायरसची त्यातच आता एकच खळबळ उडालीय ती म्हणजे केस गळतीच्या साथीने. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण शेगावात या अज्ञात आजाराने थैमान घातलय. शेगावात केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडलय. तीन दिवसात तब्बल तीस लोकांना टक्कल पडले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या साथीमागचं कारण  काय हे अद्याप पर्यंत समजू शकलेले नाही परंतु या अज्ञात आजाराने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरवले असून थैमान घातलेय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय आहे लक्षणं? 

या टक्कल पडण्याचे लक्षण म्हणजे आधी डोक्याला खाज येते, नंतर केस गळून हातात येतात. त्यानंतर तिसऱ्या दिवशी थेट टक्कल पडते. दरम्यान या अजब- गजब प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेय.   या विचित्र आजारातून महिलांना देखील जावं लागतंय. दरम्यान या सर्व गोष्टींचा छडा लावण्यासाठी आरोग्यविभागाची टीम शेगावात दाखल झाली असून तपास सुरु आहे. 

दरम्यान कालच दादर येथून देखील एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका अज्ञाताने महाविद्यालयीन तरुणीचे केस कापून नेले होते. आणि त्यातच आता अजून दुसरं म्हणजे शेगावात मोठ्या प्रमाणात केस गळती होऊन अनेकांना टक्कल पडत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या संपूर्ण प्रकाराने एकच खळबळ उडाली असून तीन दिवसात तब्बल तीस लोकांना टक्कल पडल्याने आरोग्य टीम संबंधित गावात दाखल होऊन तपासणी करीत आहे. 


सम्बन्धित सामग्री