२२ सप्टेंबर, २०२४ : राशपचे नेता एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 'गणपती विसर्जनासह माझा भाजप प्रवेशही विसर्जित झाला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातच राहणार आहे', असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
'गणपती विसर्जनानंतर मी भाजपा प्रवेश करेन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला आहे. मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थायी सदस्य आहे आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय काम करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार आहे', असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.