मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करत विविध पक्षांच्या उमेदवारांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरले. गुरुपुष्यामृत योग साधून उमेदवारांनी अर्ज भरले. पुण्यात भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी संकल्प यात्रा काढत उमेदवारी अर्ज भरला. शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. तर ठाकरे सेनेच्या आदित्य ठाकरेंनी मुंबईत तर राजन विचारे आणि केदार दिघेंनी ठाण्यात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले. मनसेच्या अविनाश जाधव यांनी ठाण्यामध्ये तर राजू पाटील यांनी कल्याणमध्ये शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. पवारांच्या राष्ट्रवादीच्या अशोक पवार यांनीही शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. या नेत्यांसह राज्यातील विविध पक्षांच्या अनेक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले.
