ICC Champions Trophy 2025 : फायनल सामना रद्द झाल्यास कोण होईल विजेता? काय आहे ICC चा नियम
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेचा फायनल सामना 9 मार्च रोजी भारत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील. याआधी साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. पण आता न्यूझीलंडने चांगली कामगिरी करत फायनलमध्य धडक मारली आहे. यामुळे अंतिम सामन्यात दोन्ही संघांवर दडपण असणार आहे.
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने पावसामुळे वाया गेले आहेत. पण ICC कडून नॉकआउट सामन्यांसाठी खास नियम तयार करण्यात आले आहेत. फायनलसाठी रिझर्व डे म्हणजे राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ 9 मार्च रोजी सामना पूर्ण होऊ शकला नाही. तर तो 10 मार्चला जिथून सामना थांबला होता तिथूनच सुरू केला जाईल. जर दोन्ही दिवशी सामना पूर्ण होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात येईल. म्हणजेच भारत आणि न्यूझीलंड दोघेही चॅंपियन्स ट्रॉफीचे विजेते ठरतील. तसेच डकवर्थ-लुईस नियमानुसार जर निकाल लावायचा असेल तर किमान 25-25 षटकांचा खेळ होणे आवश्यक आहे.
हेही वाचा - ODI World Cup 2025: रोहित शर्माने रचला इतिहास. जाणून घ्या
याआधी फायनल रद्द झाल्याचा प्रसंग
ICC Champions Trophy च्या इतिहासात याआधी एकदाच अंतिम सामना रद्द झाला आहे. 2002 साली भारत आणि श्रीलंका यांच्यातील फायनल सामना पावसामुळे खेळला जाऊ शकला नाही. त्या वेळीही राखीव दिवस होता. पण त्यादिवशीही पाऊस आला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले होते.
हेही वाचा - IPL 2025: KKR चा नवा कर्णधार जाहीर, अजिंक्य रहाणेकडं संघाची धुरा
भारताने अजिंक्य राहत ICC Champions Trophy स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भारती संघाचे अंतिम सामन्यात काहीसे पारडे जड असणार आहेत. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर शुभमन गिलकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे. तर गोलंदाजीत भारतीय टीम चार फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. यात वरूण चक्रवर्तीला अंतिम संघात स्थान मिळू शकतं.