Monday, September 01, 2025 12:57:16 AM

Chanakya Niti : या जीवन बरबाद करणाऱ्या सवयी लगेच सोडून द्या; नंतर पश्चाताप वाटून उपयोग नाही

चाणक्यांनी माणसाच्या वाईट सवयींविषयी काही सावधानतेचे इशारे दिले आहेत. जाणून घेऊ, या कोणत्या सवयी आहेत, ज्या प्रत्येकाने ताबडतोब सोडून दिल्या पाहिजेत.

chanakya niti  या जीवन बरबाद करणाऱ्या सवयी लगेच सोडून द्या नंतर पश्चाताप वाटून उपयोग नाही

Chanakya Niti about Bad Habits : चाणक्य यांना त्यांच्या काळातील सर्वात ज्ञानी आणि विद्वान व्यक्ती मानले जात असे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक धोरणे बनवली होती, जी आजही सर्वांना उपयोगी पडत आहेत. याचा बऱ्याच लोकांनी अनुभव घेतला आहे. यामुळे आचार्य चाणक्य आजही सर्वांसाठी आदर्श आहेत.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या शिकवणीमध्ये अशा काही वाईट सवयींविषयी सांगितले आहे, ज्या माणसाचे आयुष्य रसातळाला घेऊन जातात. चाणक्यांनी माणसाकडून होणाऱ्या चुकांविषयी काही सावधानतेचे इशारे दिले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. आचार्य चाणक्य यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर असे धोरण दिले आहे जे आजही पूर्णपणे प्रासंगिक आहेत. जे लोक जीवनात यशस्वी आणि समृद्ध होऊ इच्छितात, त्यांनी आचार्य चाणक्यांच्या या धोरणांचे पालन जरूर करावे. निश्चितच त्यांचे जीवन अधिक चांगले होईल.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात स्पष्टपणं सांगितले आहे की एखाद्या व्यक्तीचं यश किंवा अपयश, त्याचं सुख-दुःख, त्याचं चारित्र्य हे सर्व त्याच्या सवयींवर अवलंबून असतं. सवयींचा माणसावरचा प्रभाव त्या माणसाच्या क्षमतांपेक्षाही जास्त असतो. काही सवयी माणसाला मोठ्या उंचीवर घेऊन जातात तर, काही हळूहळू सर्वकाही नष्ट करतात.
प्रत्येकाला जीवनात काहीतरी चांगले करण्याची, बनण्याची इच्छा असते. तेव्हा, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. जर, तुम्हालाही या 3 सवयी असतील, तर त्यापासून लगेच पिच्छा सोडवून घ्या. अन्यथा, नंतर पश्चाताप करण्याचीही वेळ हातात राहणार नाही.

हेही वाचा - Chanakya Niti : चुकूनही या 3 गोष्टींची लाज बाळगू नये; अन्यथा, होते नुकसान

आळशीपणा
आळस ही एक सवय आहे जी तुमची स्वप्नं साकार होण्याचा मार्गातला मोठा अडथळा असते. अनेक शत्रू मिळून तुमचं जेवढं नुकसान करू शकत नाहीत, तेवढं नुकसान फक्त आळसामुळे होतं. आळसामुळे हातातील वेळ आण संधी दोन्हीही सुटून जातात. आळसामुळे वेळेचा योग्य वापर करण्यापासून आपण नेहमी दूर राहतो. त्यामुळे आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून जर तुम्हाला काही साध्य करायचं असेल तर आजच आळस सोडा.

रागीटपणा, शीघ्रकोपिष्ट स्वभाव
राग ही अशी भावना आहे, जी माणसाची विचार करण्याची क्षमता नष्ट करते. रागाच्या भरात आपण अनेकदा असे शब्द बोलतो, ज्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा प्रियजनांना त्रास होतो. शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकते. योग्य ठिकाणी राग असणं आवश्यकच आहे. पण अतिराग, शीघ्रकोपीपणा अत्यंत गंभीर स्थितीत नेऊन ठेवतात. म्हणून रागावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तो आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. रागाच्या भरात अविचाराने निर्णय घेणं नेहमी टाळलं पाहिजे.

वाईट संगत
जशी संगत असते, तसेच जीवन घडते. जर आपण आळशी, कपटी किंवा नकारात्मक विचारसरणीच्या लोकांसारख्या चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिलो तर, आपणही तसेच बनतो. तुम्ही ज्या संगतीत राहता त्याचा तुमच्या आयुष्यावरही तोच परिणाम होईल. वाईट संगतीमुळे चारित्र्यही खराब होऊ शकते. जर तुम्ही नकारात्मक किंवा वाईट विचारसरणीच्या लोकांसोबत राहिलात तर त्यांचा तुमच्यावरही परिणाम होतो. चांगल्या लोकांची संगत माणसाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. म्हणून नेहमी तुमची संगत सुज्ञपणे निवडा, अन्यथा जीवनाची दिशा चुकीची होऊ शकते. योग्य संगत यश आणि चारित्र्य दोन्ही मजबूत बनवते. सुसंगती असली पाहिजे, ही बाब सर्वच महान लोकांनी सांगितली आहे.

हेही वाचा - Chanakya Niti : तुमच्या प्रियकर/प्रेयसीचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का? फसवणूक करणारी व्यक्ती कशी ओळखाल?

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री