मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी अल्पकालीन हवामान इशारा जारी केला आहे. हवामान अंदाजानुसार, पुढील 3 ते 4 तासांत विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचे वारे आणि वेगवेगळ्या तीव्रतेचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. उस्मानाबाद, सोलापूर, बीड, मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक आणि पालघर येथे विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.
हेही वाचा - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या गडावर पावसाने दिली जोरदार हजेरी
ठाणे, रायगडसह 'या' राज्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस -
ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे विजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. परभणी, लातूर, नांदेड, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.
हेही वाचा - देशभरातील विविध भागात पावसाचा कहर! दिल्ली-महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये पावसाचा इशारा
दरम्यान, धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथे विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. भारतीय हवामान खात्याने प्रभावित भागातील रहिवाशांना बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.