Sunday, August 31, 2025 04:48:58 AM

वाशिममध्ये नाताळचा उत्साह

वाशीमच्या नॅझरिन चर्चमध्ये प्रभू येशूच्या जन्मदिवसाचे उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.

वाशिममध्ये नाताळचा उत्साह

वाशिम : वाशीमच्या नॅझरिन चर्चमध्ये प्रभू येशूच्या जन्मदिवसाचे उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. यावेळी ख्रिस्त जन्माच्या देखाव्याने, दिव्यांच्या रोषणाईने आणि आकर्षक ख्रिसमस ट्रीने चर्च परिसर सजवला आहे.

या कार्यक्रमात कॅरल गायन, नृत्य, नाटक, आणि प्रभू येशूच्या जीवनावर आधारित सादरीकरणांनी उपस्थितांना भावविभोर केले. यामध्ये प्रभू येशूच्या जीवनाचा संदेश आणि त्यांचे प्रेम, त्याग आणि शांतीचा आदर्श प्रभावीपणे मांडण्यात आला. कार्यक्रमादरम्यान वैभव अल्लाडा यांनी सांताक्लॉझच्या भूमीकेत येऊन चॉकलेट, भेट वस्तू आदींचे वाटप करत उपस्थितांचे मनोरंजन केले.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

शांती, प्रेम आणि समृद्धीचा प्रसार व्हावा, जगभरात शांतता नांदावी, यासाठी वाशीम येथील ख्रिस्ती बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली. या निमित्ताने चर्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून प्रभू येशूच्या जन्माचा आनंद साजरा केला.

 

हेही वाचा : नाताळनिमित्त समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

 

येशू जन्माचा गवताच्या गव्हाणामध्ये साकारण्यात आलेला देखावा यावेळी आकर्षण ठरला.


सम्बन्धित सामग्री