मुंबई: हिंदु संस्कृतीत दीप अमावस्या (Deep Amavasya 2025) ज्याला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते. हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा दिवस आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच अमावस्येला साजरा केला जातो. यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. यंदा 24 जुलै रोजी दर्श अमावस्या आहे. आज आपण दीप अमावस्येचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व जाणून घेणार आहोत...
हिंदु परंपरेत दिवा हा प्रकाश, ज्ञान, शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो. देवघरात दिवा लावणे म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करणे होय.
दीप अमावस्येचे विशेष महत्त्व
आषाढ अमावस्या जी दीप अमावस्या (Deep Amavasya 2025) म्हणून साजरी केली जाते. विशेषत: महाराष्ट्र आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते. या दिवशी घरातील सर्व पणती, समई आणि निरांजन स्वच्छ करुन त्यांची पूजा केली जाते. ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करुन श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते.
हेही वाचा: Sawan Shivratri 2025: नंदीच्या कोणत्या कानात बोलल्याने तुमची इच्छा पूर्ण होते?, लगेच शंकरापर्यंत पोहोचेल इच्छा..
दीपपूजन
- या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुऊन, त्यांना तेल किंवा तूप लावून प्रज्वलित केले जातात. काही ठिकाणी घराच्या आजूबाजूला आणि तुळशीजवळही दिवे लावले जातात.
- दीप पूजनामुळे (Deep Pujan 2025) घरात समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते. दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो, असेही म्हणतात.
- गोडाचा नैवेद्य अर्पण करून आणि चातुर्मासातील कथांचे वाचन करून हा उत्सव साजरा केला जातो.
श्रावणाचे स्वागत
दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या (Shravan Mahina) आगमनाची तयारी आहे. श्रावणात अनेक सण, उत्सव आणि व्रत असतात. ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते. दीप पूजनाने या महिन्याचे स्वागत केले जाते.
दीप अमावस्येला काय करावे?
- घराची स्वच्छता: घर स्वच्छ करून, रांगोळी काढावी आणि फुलांचे तोरण लावावे.
- दीप प्रज्वलन : मातीचे किंवा धातूचे दिवे तेल/तूप लावून प्रज्वलित करावे. घरामध्ये, तुळशीजवळ आणि दारात दिवे लावावेत.
- पूजा आणि मंत्र पठण: देवाची पूजा, पितृ तर्पण (पितरांची पूजा) आणि मंत्रांचे पठण करावे.
- नैवेद्य: गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा आणि कथांचे वाचन करावे.Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)