Monday, September 01, 2025 07:19:22 AM

देवेंद्र फडणवीसांचा उमेदवारीसाठी आनंद व्यक्त, ट्विटरवर शुभेच्छा!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर ट्विटरवर शुभेच्छा दिल्या

देवेंद्र फडणवीसांचा उमेदवारीसाठी आनंद व्यक्त ट्विटरवर शुभेच्छा

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाकडून सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले आहेत.

फडणवीस म्हटले की, "भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. माझा प्रयत्न असेल की, पक्षनेतृत्त्व, दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील नागरिक आणि महाराष्ट्रातील जनतेने दाखविलेल्या विश्वासास सार्थ ठरवणे."

भाजपच्या पहिल्या यादीत त्यांच्या व्यतिरिक्त आणखी ९८ उमेदवार जाहीर झाले आहेत, ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समावेश आहे. फडणवीस यांनी यादीतील सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

हे सर्व उमेदवार आगामी निवडणुकीत प्रचंड यश मिळवून भाजपाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


 


सम्बन्धित सामग्री