Thursday, September 04, 2025 04:29:59 AM

प्रत्यक्ष कर संकलनाने गाठला विक्रमी आकडा

देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या दशकात तब्बल १८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रत्यक्ष कर संकलनाने गाठला विक्रमी आकडा

नवी दिल्ली : देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या दशकात तब्बल १८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ अखेरीस प्रत्यक्ष कर संकलन १९.६० लाख कोटींवर पोहोचले आहे. प्रत्यक्ष कर संकलनात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचा हा विक्रमी आकडा आहे. २०१४-१५ मध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान सरकार पहिल्यांदा सत्तेत आले. त्या वर्षअखेर, प्रत्यक्ष कर संकलन सुमारे ६.९६ लाख कोटी रुपये होते. यामध्ये सुमारे ४.२९ लाख कोटी रुपये कंपनी कर आणि २.६६ लाख कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश होता. आता मात्र कंपनी कराच्या तुलनेत वैयक्तिक प्राप्तिकर संकलन अधिक झाले आहे.

प्राप्तिकर विभागाची आकडेवारी खालीलप्रमाणे 

  • आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या तुलनेत दशकभरात प्रत्यक्ष कर संकलन १८२ टक्क्यांनी वाढले
  • आर्थिक वर्ष २०२३-२४ अखेरीस प्रत्यक्ष कर संकलन १९.६० लाख कोटींवर पोहोचले आहे
  • आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये करदात्यांची संख्या  ५.७० कोटी होती
  • आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये करदात्यांची संख्या १०.४१ कोटींवर पोहोचली आहे.
  • कंपनी कर संकलन २०२३-२४ अखेर ९.११ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले
  • वैयक्तिक प्राप्तिकर संकलन चार पटीने वाढून १०.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले
  • आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ४.०४ कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल होती
  • आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ८.६१ कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल झाली 
  • प्रत्यक्ष कर ते जीडीपी गुणोत्तर हे २०१४-१५ मध्ये ५.५५ टक्के
  • तर २०२३-२४ मध्ये हे गुणोत्तर ६.६४ टक्क्यांपर्यंत वधारले आहे

सम्बन्धित सामग्री