Sunday, August 31, 2025 07:49:03 AM

Weight Loss Breakfast: 7 दिवस सलग खा 'हा' नाश्ता; 30 दिवसांत वजनात होतील चमत्कारिक बदल

सकाळी शरीराला प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ मिळाले तर दिवस ऊर्जेने भरलेला जातो. योग्य आहार घेतल्यास एका महिन्यात 3-4 किलो वजन सहज घटवता येते.

weight loss breakfast 7 दिवस सलग खा हा नाश्ता 30 दिवसांत वजनात होतील चमत्कारिक बदल

Weight Loss Breakfast: वजन कमी करायचे असेल तर सकाळचा नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा आहार असतो. सकाळी शरीराला प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ मिळाले तर दिवस ऊर्जेने भरलेला जातो. योग्य आहार घेतल्यास एका महिन्यात 3-4 किलो वजन सहज घटवता येते. नाश्त्यासोबत मल्टीग्रेन पदार्थ, पालक, बीन्स, गाजर यांचा आहारात समावेश करा. गरज पडल्यास भाज्यांचे सूप प्या. गोड खाण्याची इच्छा असल्यास केळी, स्ट्रॉबेरी, ग्रीक योगर्ट यांसारखी फळे खा. यात तुम्ही चिया सिड्स देखील मिसळू शकता. शक्य तितक्या वेळा सॅलड आणि अंडी खा. खाली दिलेला 7 दिवसांचा स्मूदी प्लॅन पाळल्यास वजन घटण्याबरोबरच शरीर तंदुरुस्त राहील.

सोमवार
1 एवोकॅडो आणि 1 आंबा मिक्स करून स्मूदी तयार करा. हवे असल्यास 1-2 चमचे चिया बियाणे किंवा ओट्स मिसळा. यामुळे तुमचे पोट लवकर भरेल, दिवसभर ऊर्जा मिळेल आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

मंगळवार
अर्धा लिंबू, 1 सफरचंद आणि 1/4 अननस एकत्र करून स्मूदी बनवा. ही स्मूदी शरीर डिटॉक्स करते, चरबी कमी करते आणि दिवसभर ताजेतवाने ठेवते.

हेही वाचा - Health Tips: 'या' पाच मसाल्याच्या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा; कर्करोगाचा धोका होईल कमी

बुधवार
1 टोमॅटो, 1 सफरचंद आणि 1 गाजर मिक्स करा. ही स्मूदी वजन कमी करण्याबरोबरच त्वचेची गुणवत्ता सुधारते. नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावर चमक येते.

गुरुवार
4 स्ट्रॉबेरी, 1 केळी आणि काही ब्लूबेरी मिसळून स्मूदी तयार करा. यातून उच्च ऊर्जा मिळते, तसेच लठ्ठपणाही कमी होतो.

शुक्रवार
1 केळी, 1 कप भिजवलेले चिया सिड्स आणि 1 कप ओट्स मिक्स करा. ही स्मूदी स्नायू बळकट करण्यास मदत करते आणि बराच वेळ पोट भरलेले राहते.

हेही वाचा - Health Tips: रिकाम्या पोटी प्या कढीपत्त्याचा जादुई रस; 'हे' आजार होतील एका क्षणात दूर

शनिवार
1 गाजर, 1 संत्री आणि 1 सफरचंद मिक्स करून स्मूदी बनवा. यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि त्वचेला नैसर्गिक तेज देते.

रविवार
1 एवोकॅडो, 1 केळी आणि काही बदाम मिक्स करा. ही स्मूदी मूड सुधारते, तणाव कमी करते आणि चरबी घटवण्यास मदत करते.

हा प्लॅन फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर एकंदर आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. नियमित व्यायाम, पुरेसे पाणी आणि योग्य झोप यामुळे याचा परिणाम अधिक वेगाने दिसून येतो. 

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 
 


सम्बन्धित सामग्री