Wednesday, August 20, 2025 09:48:03 AM

Devendra Fadanvis vs Uddhav Thackeray: स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावलाय. विकासकामं आणि योजनांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही अशी घणाघाती टीका.

devendra fadanvis vs uddhav thackeray स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावलाय. विकासकामं आणि योजनांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे त्याच बरोबर विरोधकांवर केलीय. त्याचबरोबर आमचं सरकार हे समन्वयाने चालणारं सरकार आहे आणि आम्ही तिघे एकत्र मिळून निर्णय घेतो असंही स्पष्ट करत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावलाय. 

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? 

 विकासकामं आणि योजनांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच सरकारमध्ये घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथ शिंदेंचीच नसून आम्ही तिघे एकत्र बसून निर्णय घेतो असही फडणवीसांनी स्पष्ट केलंय. प्रकल्प आणि विकासकामांना देण्यात आलेल्या स्थगितीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर देत समाचार घेतला आहे. 
तसेच आमचं सरकार हे समन्वयाने चालणारं सरकार आहे आणि आम्ही तिघे एकत्र मिळून निर्णय घेतो असंही स्पष्ट करत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे. 

हेही वाचा:Ladki Bahin Yojana Installment Date: लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यास सुरुवात

त्याचबबरोबर 15 एप्रिलला 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्यानंतर 15 दिवसानंतर कोणी किती काम केले याचे मूल्य मापन करण्यात येणार आहे. ज्यांनी 50 टक्क्यांपेक्षा कमी केलं त्यांना निगेटिव्ह लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी काम चांगले केले त्यांचा सत्कार राज्य सरकारच्यावतीने 1 मे ला करणार आहे.

हल्ली रोज बातम्या समोर येतात की देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला स्थगिती दिली . स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही. यापूर्वी देखील मी स्पष्ट केले आहे की, शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले त्यात मी देखील होतो. ज्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या आढळल्या त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिली आहे. अजितदादा थेट अटॅक करतात म्हणून त्यांच्या वाट्याला कोण जात नाही. हे सरकार समन्वयाने चालणारे सरकार आहे. या सरकारमध्ये आम्ही तिघेही मिळून निर्णय घेतो, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.


सम्बन्धित सामग्री