Monday, September 01, 2025 05:56:46 PM

वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली यादी शनिवारी

वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली यादी शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली यादी शनिवारी

मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पसंतीक्रम भरताना आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षेची पहिली प्रवेश यादी ३१ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी केलेल्यापैकी ३९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरला आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १ सप्टेंबरपासून महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. विद्यार्थ्यांना ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.                                                                                                                                                                   
 


सम्बन्धित सामग्री