Sunday, August 31, 2025 05:47:23 PM

IND vs NZ: 4852 वनडे सामन्यांमध्ये प्रथमच घडला असा विक्रम, तुम्हाला विश्वास बसणार नाही!

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात एक अनोख्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. वनडे क्रिकेटच्या 4852 सामन्यांच्या इतिहासात प्रथमच असा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

ind vs nz 4852 वनडे सामन्यांमध्ये प्रथमच घडला असा विक्रम तुम्हाला विश्वास बसणार नाही
IND vs NZ: 4852 वनडे सामन्यांमध्ये प्रथमच घडला असा विक्रम, तुम्हाला विश्वास बसणार नाही!

टीम इंडियाने ICC Champions Trophy 2025 स्पर्धेत आपला विजयाचा सिलसिला कायम ठेवत न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला. यासह स्पर्धेत अजेय राहत थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आता सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची गाठ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात एक अनोखा विक्रमाची नोंद झाली. असा विक्रम याआधी वनडे क्रिकेटमध्ये कधीही घडला नव्हता.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताच्या फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने 5 गडी बाद केले. तर न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज मॅट हेनरी याने देखील 5 गडी बाद केले. तुम्ही म्हणाल, यात खास काय आहे. पण दोघांनी एकच विक्रम साधला. त्यांनी समान धावा (42) देऊन प्रत्येकी 5 गडी बाद केले. वनडे क्रिकेटच्या 4852 सामन्यांच्या इतिहासात प्रथमच दोन गोलंदाजांनी एका सामन्यात समान धावा देत पाच विकेट्स घेतल्या आहेत. हा एक अनोखा विक्रम आहे. 

हेही वाचा -  रोहित शर्माने मुंबईतील अपार्टमेंट भाड्याने दिले; दरमहा मिळणार 'इतके' भाडे

मॅट हेनरीने भारताच्या टॉप ऑर्डरला मोठा धक्का दिला. त्याने शुभमन गिल (2), विराट कोहली (11), हार्दिक पांड्या (42), रवींद्र जडेजा (16) आणि मोहम्मद शमी (0) यांना माघारी धाडले. तर वरूण चक्रवर्तीच्या फिरकी जाळ्यात न्यूझीलंडचे फलंदाज अडकले. त्याने विल यंग (22), ग्लेन फिलिप्स (12), मायकेल ब्रेसवेल (2), मिचेल सॅंटनर (28) आणि मॅट हेनरी (2) यांना बाद केले.

हेही वाचा -  IND vs AUS: सेमीफायनलपूर्वी टीम इंडियात बदल?, 'या' खेळाडूची जागा धोक्यात!

भारताने असा जिंकला सामना 
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीकडून मोठ्या डावाची अपेक्षा होती. मात्र मॅट हेनरीने भेदक मारा करत भारताला सुरुवातीलाच हादरे दिले. कोहलीही लवकर बाद झाल्याने भारताची अवस्था नाजूक झाली होती. तेव्हा श्रेयस अय्यर (56) आणि हार्दिक पांड्या (42) यांनी डाव सावरला. केएल राहुलने संयमी खेळ करत नाबाद 41 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे भारताला 50 षटकांत 267 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळाली नाही. मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याने सुरुवातीपासूनच दबाव टाकला. विल यंग आणि ग्लेन फिलिप्स यांनी काही काळ प्रतिकार केला. पण चक्रवर्तीच्या फिरकीसमोर न्यूझीलंडच्या मधला फळीतील फलंदाजांनी शरणागती पत्कारली. शेवटी न्यूझीलंड संघ 223 धावांत सर्वबाद झाला आणि भारताने 44 धावांनी विजय मिळवला.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा विजयी प्रवास
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सलग तीन सामने जिंकत सेमीफायलन गाठले. भारताची सेमीफायनलमध्ये गाठ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.


सम्बन्धित सामग्री