Monday, September 01, 2025 12:31:47 AM

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; डिसेंबरच्या ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे

लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.

ladki bahin yojana  लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी डिसेंबरच्या ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिलांना डिसेंबर महिन्यातील हप्त्याची प्रतीक्षा होती. मात्र आता महिलांची प्रतीक्षा संपली आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता याच महिन्यात मिळणार आहे.

 

लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यातच मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना योजनेचा लाभ होणार आहे. आजपासून हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर डिसेंबरच्या शेवटपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

 

राज्यात लाडकी बहीण योजनेची चर्चा सर्वत्र आहे. विधानसभा निवडणूकीच्या आधी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेतून राज्यातील महिलांना दरमहा १५०० रूपये मिळतात. या रकमेत वाढ करून सरकारने महिलांना दरमहा २१०० रूपये देण्याचे आश्वासान दिले आहे. महिलांना नोव्हेंबरपर्यंतचा हप्ता मिळाला असून त्यांना आता डिसेंबर महिन्यात मिळणाऱ्या हप्त्याची प्रतीक्षा होती. मात्र त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.

 

हेही वाचा : Ladaki Bahin: नवीन वर्षात लाडक्या बहिणींना गिफ्ट; 'या' महिन्यात मिळणार पैसे

 

लाडकी बहीण योजनेचा हप्ता याच महिन्यात महिलांना मिळणार आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यास जुलैपासून सुरू झाली आहे. नोव्हेंबरपर्यंत हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. महिलांना डिसेंबर महिन्यात मिळणाऱ्या पैशांची चिंता होती. मात्र राज्य सरकारने आज महिलांची चिंता मिटवली आहे. महिलांना डिसेंबर महिन्यातच या महिन्याचा हप्ता मिळणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

सरकारने विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेत महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडू नये म्हणून त्यांना आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे पाठवले होते. त्यांनतर महिलांचे डिसेंबर महिन्यातील हप्त्याकडे लक्ष लागले होते. मात्र आता डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.   

 

 

 

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री