Monday, September 01, 2025 04:33:03 PM

हिंदूंच्या संरक्षणासाठी जम्मूतून हिंदू जोडो यात्रा

हिंदू जोडो यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे एकच आहे जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन प्रांतवाद आणि जातीवाद संपवून एकजुटीचे महत्व समजून हिंदू समाजाला एकत्र आणणे.

हिंदूंच्या संरक्षणासाठी जम्मूतून हिंदू जोडो यात्रा 

मुंबई : देव, देश, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी आदिनाथ संप्रदायाचे पिठाधीश्वर श्री श्री १००८ कल्किराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जोडो यात्राचे आयोजन ९ जानेवारी २०२५ रोजी जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत केले गेले आहे. ही ऐतिहासिक यात्रा १६ राज्यातून ११,००० किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

यात्रेची जनजागृती महाराष्ट्रात अधिक प्रभावी व्हावी यासाठी कल्किराम महाराज यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जनजागृती रॅली १३ नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथून आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने प्रारंभ केली गेली आहे. महाराष्ट्रातील सात विभागांमध्ये ही रॅली आयोजित करण्यात आली आहे - मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि नागपूर.


हिंदू जोडो यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे एकच आहे जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन प्रांतवाद आणि जातीवाद संपवून एकजुटीचे महत्व समजून हिंदू समाजाला एकत्र आणणे. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन भारत देशातील हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.पण भारतीय आहोत आपल्यासाठी भारत देश महत्त्वाचा आहे अल्पसंख्यांक मध्ये जात असलेला हिंदू समाज आज सर्वतो परी एकत्र येणे गरजेचे आहे.

यासाठी महाराष्ट्रात या जनजागृती रॅलीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले गेले आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे अठरापगड बारा बलुतेदार यांना घेऊन चालणाऱ्या हिंदुत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ह्या रॅली चे आयोजन केले गेले आहे. १८ नोव्हेंबर रोजी नाशिक येथील काळाराम मंदिर येथे गंगारती करून या जनजागृती रॅलीचा समारोप होईल.


सम्बन्धित सामग्री