पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर तालुक्यातील कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मराठी विषय घेण्यापासून रोखले जात असल्याचे लेखी पत्र विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते. त्यावर विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अहवालानुसार महाविद्यालयावर काय कारवाई होणार ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.