Sunday, August 31, 2025 08:15:20 PM

इस्कॉन मंदिराचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इस्कॉन मंदिराचे लोकार्पण होणार आहे.

इस्कॉन मंदिराचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इस्कॉन मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यानिमित्त खारघरमधील इस्कॉन मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. 

इस्कॉन मंदिरात आकर्षक फुलांची सजावट 

इस्कॉन मंदिर ट्रस्टने खारघरमध्ये उभारलेल्या मंदिराचे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. आज इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे.  इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसन्स (इस्कॉन) ही एक जागतिक संस्था आहे. इस्कॉनमधील अनुयायी जगभर भगवद्गगीता आणि हिंदू धर्म, संस्कृतीचा प्रचार करतात. खारघरमधील इस्कॉन मंदिराला 160 कोटींचा खर्च करण्यात आला असून आज या मंदिराचे लोकार्पण होणार आहे.लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. 

नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे आज लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी नवी मुंबईत मोठी बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळते. वाहतुकीचे मार्ग वळवण्यात आले असून प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त केला आहे. 


कसं आहे इस्कॉन मंदिर? 

आशियातील सर्वात दुसरे मोठे इस्कॉन मंदिर
एकूण 9 एकरावर मंदिर उभारणी 
संपूर्ण संगमरवरी पांढऱ्या शुभ्र दगडात बांधकाम 
मंदिरात थ्रीडी फोटोंच्या आधारे श्रीकृष्ण लीलांचं दर्शन
मंदिर उभारणीसाठी तब्बल 12 वर्षांचा कालावधी 
मंदिर परिसरात आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊस 
नौकायनासाठी भव्य तलावाची निर्मिती
वैदिक शिक्षणासाठी कॉलेज लायब्ररी 
प्रसाद वाटपासाठी भव्य प्रसादम हॉल
आयुर्वेदिक हिलींग सेंटरमध्ये आयुर्वेद, योगाभ्यास आणि मंत्राभ्यासाची सोय
शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटची सोय  
मंदिरात 3 हजार भक्तांना एकत्र बसण्याची व्यवस्था 


इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा थोड्याच वेळात संपन्न होणार आहे. यासाठी भक्तगणांनी या ठिकाणी येण्यासाठी गर्दी केली आहेत. भारतभर तीर्थक्षेत्र पायी पदयात्रा करत चालणारा शिवा राजपूत याला मंदिर प्रशासनाकडून बोलवणे आले असल्याची माहिती त्याने माध्यमांना दिली आहे. 


सम्बन्धित सामग्री