Wednesday, August 20, 2025 09:46:43 PM

मनमाड लॉटरीच्या भाग्यवान विजेत्याने जिंकले २१ लाखांचे बक्षीस

नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून आनंदाची बातमी आली आहे. मनमाडमध्ये २९ सप्टेंबरच्या संध्याकाळी 'राजश्री फिफ्टी वीकली लॉटरी' स्पर्धेत भाग्यवान विजेत्याने २१ लाखांचे बक्षीस जिंकले.

मनमाड लॉटरीच्या भाग्यवान विजेत्याने जिंकले २१ लाखांचे बक्षीस

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून आनंदाची बातमी आली आहे. मनमाडमध्ये २९ सप्टेंबरच्या संध्याकाळी 'राजश्री फिफ्टी वीकली लॉटरी' स्पर्धेत भाग्यवान विजेत्याने २१ लाखांचे बक्षीस जिंकले. यामुळे विजेता, लॉटरी विक्रेता आणि मनमाडकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लॉटरीमुळे भाग्योदय होऊ शकतो हा लोकांच्या मनातला विश्वास आणखी दृढ झाला आहे. 

'या दुकानातून विकल्या गेलेल्या लॉटरीमुळे एका व्यक्तीचा भाग्योदय झाला आहे ही आनंदाची बाब आहे', असे सप्तश्रृंगी लॉटरी विक्रेत्याने सांगितले. नागरिकांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी लॉटरी विक्रीतून मिळत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. 

राजश्री लॉटरी जिंकून अनेकांनी आपली स्वप्न साकारली आहेत. राज्य शासनाच्या या लॉटरीचे दररोज अनेक ड्रॉ काढले जातात. या निमित्ताने अनेकांना नशीब आजमावण्याची संधी मिळते. दिवसागणिक लॉटरी खरेदी करणाऱ्या मनमाडकरांमध्ये वाढ होऊ लागली आहे. आयुष्यात प्रगतीची संधी प्रत्येकाला मिळते. फक्त यासाठी वेगवेगळे पर्याय तपासून बघणे आवश्यक आहे. कोणती व्यक्ती कोणत्या पर्यायाचा अवलंब केल्याने प्रगती करेल हे सांगता येत नाही. यासाठी प्रयत्नांची कास सोडू नये. कोणाला ठाऊक नशीब कधी आणि कसे बदलेल ?


सम्बन्धित सामग्री