सध्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी भावना व्यक्त केल्या आहेत.
यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा इशारा दिलाय. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबपई सोडणार नाही, त्यामुळे सरकारनं वेळकाढूपणा न करता तात्काळ आरक्षण लागू करावं असं जरांगे म्हणाले.