बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी करत आहे. त्यानंतर एक एक करत अनेक खुलासे समोर येत आहेत. तर दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी काही पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर शनिवारी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने एका खासदाराबद्दल वादग्रस्त पोस्ट केली आहे. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षकाने नाव घेणे टाळले असले तरी त्याचा रोख खासदार सोनावणे यांच्यावर होता.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सहाय्यक पोलीस अधीक्षक गणेश मुंडे यांनी वादग्रस्त पोस्ट केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक गणेश मुंडे हे चर्चेत राहिले आहेत. बीड पोलीस प्रेस ग्रुपवर त्यांनी शनिवारी एक पोस्ट केली. बीडचे खासदार सोनावणे यांनी शुक्रवारी मानवाधिकारी आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीत गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन पोलीसांच्या कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली. त्यानंतर शनिवारी सहायक पोलीस निरीक्षक मुंडे यांनी बीडच्या पोलिसांच्या ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट केली.
हेही वाचा : कराड आणि सोनवणेंच्या फोटोमुळे राजकीय चर्चा सुरू; मिटकरींची पोस्ट व्हायरल
बीड पोलीस प्रेस या व्हाट्सअप ग्रुपवर शनिवारी सायंकाळी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर असे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी म्हटले आहे. या पोस्टबद्दल काही पत्रकारांनी विचारपूस केल्यानंतर मुंडे यांनी ही पोस्ट काढून टाकली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी त्यांना ग्रुपमधून बाहेर काढलं. त्यामुळे गणेश मुंडे या पोलीस निरीक्षकाने खासदार बजरंग सोनावणे यांच्याबाबत भाष्य का केले, याची चर्चा सुरू झाली आहे.