Nagpanchami 2025: नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी नागाची पूजा करण्याची प्रथा आहे. यावर्षी नागपंचमी मंगळवारी 29 जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे. परंतु नागपंचमी का साजरी करतात, याबद्दल जाणून घेऊयात...
हिंदू धर्मात नागपंचमी साजरी करण्याच्या अनेक पौराणिक कथा आहे. नागपंचमीला नागदेवताची पूजा केली जाते. विशेष म्हणजे म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो. नागदेवताला भाऊ मानून त्याचा उपवास करण्याची पद्धत आहे.
हेही वाचा: पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक
नागपंचमीला श्रावणातील सण असून या दिवशी नागाची पूजा केली जाते. अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची या दिवशी पूजा केली जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. भगवान शंकराच्या गळ्यात वासुकी नाग आहे. यामुळे त्याला दिव्य स्थान प्राप्त झाले आहे. श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करुन भगवान शंकराच्या कृपाशिर्वादास पात्र होता येते.
नागपंचमीची पौराणिक कथा
यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला.
एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता. शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिणीच्या बिळावरून गेले आणि नागिणीची पिल्लं मरण पावली. रागाने त्या नागिणीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला. त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली तेव्हा त्या नागिणीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला.
(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)