Sunday, August 31, 2025 05:11:37 PM

दिल्लीत सरशी, भारताने बांगलादेशविरुद्धची T20 मालिकाही जिंकली

भारताने कसोटी मालिकेपाठोपाठ बांगलादेश विरुद्धची वीस वीस षटकांच्या सामन्यांची मालिकाही जिंकली.

दिल्लीत सरशी भारताने बांगलादेशविरुद्धची t20 मालिकाही जिंकली

नवी दिल्ली : भारताने कसोटी मालिकेपाठोपाठ बांगलादेश विरुद्धची वीस वीस षटकांच्या सामन्यांची मालिकाही जिंकली. भारतीय संघाने बांगलादेश विरुद्दची कसोटी मालिका २ - ० अशी जिंकली. आता भारताने बांगलादेश विरुद्धची वीस वीस षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले. हे सामने जिंकत भारताने मालिकेत २ - ० अशी विजयी आघाडी घेतली. 

दिल्लीत जेटली स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांना भोवला. भारताने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांत ९ बाद २२१ धावा केल्या. नंतर बांगलादेशने २० षटकांत ९ बाद १३५ धावाच केल्या. भारतीय संघाने दिल्लीतला सामना ८६ धावांनी जिंकला. भारताकडून ३४ चेंडूत सात षटकार आणि चार चौकार मारत ७४ धावा करणारा नितीश रेड्डी सामनावीर झाला. नितीशने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्याने चार षटकांत २३ धावा देत बांगलादेशच्या दोन फलंदाजांना बाद केले. 

भारत विरुद्ध बांगलादेश
पहिली कसोटी, चेन्नई - भारताचा २८० धावांनी विजय
दुसरी कसोटी, कानपूर - भारताचा सात गडी राखून विजय
पहिला T20, ग्वाल्हेर - भारताचा सात गडी राखून विजय
दुसरी T20, दिल्ली - भारताचा ८६ धावांनी विजय


सम्बन्धित सामग्री