Sunday, August 31, 2025 02:33:09 PM

Urban Company Launch Insta Maid Service: काय सांगता! आता फक्त 15 मिनिटांत तुमच्या घरी पोहोचणार मोलकरीण; अर्बन कंपनीने सुरू केली 'इंस्टा मेड्स' सेवा

आता अर्बन कंपनीने 'इंस्टा मेड्स' (Insta Maid) ही त्यांची नवीन सेवा सुरू केली आहे, जी ग्राहकांना फक्त 15 मिनिटांत मोलकरणीची सुविधा प्रदान करेल.

urban company launch insta maid service काय सांगता आता फक्त 15 मिनिटांत तुमच्या घरी पोहोचणार मोलकरीण अर्बन कंपनीने सुरू केली इंस्टा मेड्स सेवा
Urban Company Launch Insta Maid Service
Edited Image

Urban Company Launch Insta Maid Service: आजकाल घरकामासाठी मोलकरीण मिळणं खूपचं कठीण झालं आहे. पंरतु, आता तुम्हाला काळजी करण्याची गजर नाही. कारण, आता अर्बन कंपनीने 'इंस्टा मेड्स' (Insta Maid) ही त्यांची नवीन सेवा सुरू केली आहे, जी ग्राहकांना फक्त 15 मिनिटांत मोलकरणीची सुविधा प्रदान करेल. ही सेवा सध्या मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे आणि याअंतर्गत ग्राहकांना भांडी धुणे, झाडू मारणे आणि अन्न तयार करणे यासारख्या सेवा मिळतील. या सेवेची सुरुवातीची किंमत प्रति तास 49 रुपये आहे. चला तर मग या इंस्टा मेड्स मोलकरणीबद्दल जाणून घेऊयात. 

हेही वाचा - Narayana Murthy On AI: 'एआयबद्दल अतिशयोक्ती करणे थांबवा'; नारायण मूर्ती यांनी असं का म्हटलं?

'इंस्टा मेड्स' ची चाचणी आणि लाँचिंग - 

कंपनीने आपल्या फेसबुक पेजवर म्हटले आहे की, ही सेवा 245 रुपये प्रति तास दराने उपलब्ध असेल, परंतु सुरुवातीच्या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना ती फक्त 49 रुपये प्रति तास दराने मिळण्याची संधी मिळेल. सध्या ही सेवा फक्त मुंबईत उपलब्ध आहे आणि ती पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा - Deepseek नंतर, चीनने नवीन AI Assistant Manus केले लाँच; काय आहे याची खासियत? जाणून घ्या

इंस्टा मेड्स सेवा आणि त्यांचा विस्तार - 

'इंस्टा मेड्स' सेवांमध्ये भांडी धुणे, झाडू मारणे, पुसणे आणि अन्न तयार करणे यासारख्या सेवांचा समावेश आहे, ज्या सहसा घरातील मोलकरीण करते. अर्बन कंपनी आधीच घराची स्वच्छता, कीटक नियंत्रण, एसी दुरुस्ती, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार आणि इतर अनेक सेवा देते. आता 'इंस्टा मेड्स' द्वारे कंपनी ग्राहकांना जलद आणि सोयीस्कर घरपोच सेवा देत आहे. ज्यांना घरकामात तात्काळ मदत हवी आहे पण मोलकरीण शोधण्यात वेळ वाया घालवू इच्छित नाही, त्यांच्यासाठी ही सेवा खूप उपयुक्त ठरू शकते.
 


सम्बन्धित सामग्री