Thursday, September 04, 2025 04:48:39 AM

ओमर अब्दुल्लांचे घटनाविरोधी वक्तव्य

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बोलताना घटनाविरोधी वक्तव्य केले.

ओमर अब्दुल्लांचे घटनाविरोधी वक्तव्य

श्रीनगर : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बोलताना घटनाविरोधी वक्तव्य केले. भारताची घटना काश्मिरात लागू करण्यास विरोध करणार असल्याचे ते बोलले. ओमर अब्दुल्ला यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा कलम ३७० हटवण्याचा मुद्दा जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत चर्चेत आला आहे. काश्मीरच्या विकासासाठी आणि देशहितासाठी कलम ३७० हटवणे आवश्यक होते अशी ठाम भूमिका भाजपाकडून घेण्यात आली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स निवडणुकीत प्रचार करताना कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला विरोध करताना दिसत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होत आहे. आतापर्यंत दोन टप्प्यांचे मतदान झाले असून तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी होणार आहे.

जम्मू काश्मीर विधानसभा - ९० जागांसाठी मतदान
पहिला टप्पा - २४ जागा - १८ सप्टेंबर २०२४ रोजी मतदान झाले
दुसरा टप्पा - २६ जागा - २५ सप्टेंबर २०२४ रोजी मतदान झाले
तिसरा टप्पा - ४० जागा - १ ऑक्टोबर २०२४ रोजी मतदान


सम्बन्धित सामग्री