Monday, September 01, 2025 09:05:06 AM

'एका हाताने टाळी वाजत नाही...'; बलात्कार प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची संतप्त प्रतिक्रिया

न्यायालयाने आरोपीला कनिष्ठ न्यायालयात हजर करण्याचे आणि अटी व शर्तींच्या अधीन राहून अंतरिम जामीन मंजूर करण्याचे निर्देश दिले.

एका हाताने टाळी वाजत नाही बलात्कार प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची संतप्त प्रतिक्रिया
Supreme Court
Edited Image

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एका 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 23 वर्षीय व्यक्तीला अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने असे नमूद केले की, नऊ महिने तुरुंगात असूनही त्याच्यावर आरोप निश्चित झालेले नाहीत. पीडिता ही लहान मुलगी नाही. तसेच एका हाताने टाळी वाजत नाही, अशी टिप्पणी देखील सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. 

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटलं की, दिल्ली पोलिस सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असणाऱ्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा कसा नोंदवू शकतात? जेव्हा ती महिला स्वेच्छेने त्याच्यासोबत गेली होती. एका हाताने टाळी वाजत नाही. तुम्ही (दिल्ली पोलिसांनी) कोणत्या आधारावर आयपीसीच्या कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे? ती लहान मुलगी नाही. ती 40 वर्षांची महिला आहे. ते दोघीही एकत्र जम्मूला गेले होते. तुम्ही कलम 376 का लावले आहे? ही महिला सात वेळा जम्मूला जाते आणि तिच्या पतीला काहीच आक्षेप नाही? असा संतप्त सवालही यावेळी न्यायालयाने केला. 

आरोपीला अंतरिम जामीन मंजूर - 

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, आरोपी 9 महिन्यांपासून तुरुंगात असल्याने आणि आरोप निश्चित झालेले नसल्याने अंतरिम जामीन मंजूर करण्यासाठी हा योग्य खटला आहे. न्यायालयाने आरोपीला कनिष्ठ न्यायालयात हजर करण्याचे आणि अटी व शर्तींच्या अधीन राहून अंतरिम जामीन मंजूर करण्याचे निर्देश दिले. तथापि, खंडपीठाने म्हटले की तो त्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करणार नाही आणि महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार नाही. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्राप्त माहितीनुसार, सुप्रीम कोर्ट दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आरोपी तरुणाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. उच्च न्यायालयाने आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला जामीन देण्यास नकार दिला होता. पोलिस तक्रारीनुसार, 2021 मध्ये पीडित महिला जेव्हा तिच्या कपड्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शोधत होती तेव्हा तिची आरोपीशी ओळख झाली. 

सुरुवातीच्या संभाषणादरम्यान, आरोपीने प्रचारात्मक साहित्य प्रभावी दिसण्यासाठी आयफोन मागितला. जो महिलेने जम्मूमधील अधिकृत 'अ‍ॅपल स्टोअर' द्वारे उपलब्ध करून दिला. तथापि, आरोपीने आयफोन विकण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या व्यावसायिक संबंधांमध्ये बिघाड झाला. अधिकृत डीलरने 20 हजार रुपये कापून महिलेच्या खात्यात पैसे परत केले. तक्रारीत म्हटले आहे की आरोपीने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले असले तरी, काही काळानंतर महिलेने त्याच्याशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा - हनीमूनसाठी शिलाँगला गेलेलं इंदूरचं जोडपं बेपत्ता; रेंटवर घेतलेली अ‍ॅक्टिव्हा आढळली, 11 मे रोजी झालं होतं लग्न

दरम्यान, आरोपी डिसेंबर 2021 मध्ये नोएडा येथील महिलेच्या घरी 20 हजार रुपये परत करण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी गेला. त्यानंतर त्याने महिलेला प्रमोशनल शूटसाठी कनॉट प्लेसला जाण्यास राजी केले. प्रवासादरम्यान, आरोपीने तिला ड्रग्ज असलेली मिठाई दिली, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. आरोपीने तिला हिंदू राव रुग्णालयात नेण्याची ऑफर दिली. त्यानंतर त्याने   रुग्णालयाच्या मागे एका निर्जन भागात महिलेवर लैंगिक अत्याचार केले, तिच्या पर्समधून पैसे चोरले आणि तिचे अश्लील फोटो काढले.

हेही वाचा - राहुल गांधींना वाराणसी कोर्टाकडून दिलासा! भगवान रामावर केलेल्या टिप्पणीविरुद्धची याचिका फेटाळली

तक्रारीनुसार, या सर्व प्रकारानंतर आरोपी महिलेला जम्मूला जाण्यास भाग पाडत होता. जिथे आरोपीने तिच्यावर अडीच वर्षांच्या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात, भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 354 (महिलेवर हल्ला), 323 (जाणूनबुजून दुखापत करणे), 506 (गुन्हेगारी धमकी), 509 (महिलेच्या विनयभंग) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 


सम्बन्धित सामग्री